MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

Sugar Export Update : साखर निर्यातबंदी कायम; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार भारताने साखरेची अनियंत्रित निर्यात रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीत देशात साखरेचे दर वाढले आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत साखर निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता.

Sugar export news

Sugar export news

Mumbai News : साखर निर्यातीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आज (दि.१८)जाहीर केले आहे की सर्व प्रकारच्या साखरेच्या निर्यातीवरील बंदी ३१ ऑक्टोबरपासून पुढे कायम राहणार आहे. ही साखर बंदी संबंधित सार्वजनिक सूचनांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार युरोपियन युनियन आणि अमेरिका मध्ये निर्यात केलेल्या साखरेवर लागू होणार नाही, असंही यात नमूद करण्यात आले आहे.

अन्न विभागाने म्हटले आहे की, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार भारताने साखरेची अनियंत्रित निर्यात रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीत देशात साखरेचे दर वाढले आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत साखर निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. भारताने साखर कारखान्यांना चालू हंगामात ३० सप्टेंबरपर्यंत केवळ ६.१ दशलक्ष टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती, तर मागील हंगामात त्यांना ११.१ दशलक्ष टन विक्रमी विक्री करण्याची परवानगी होती.

दरम्यान, हवामान खात्याच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, पश्चिम राज्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्य कर्नाटकातील ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस झाला. यामुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जे भारतातील एकूण साखर उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक आहे. या वर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा ५० टक्के कमी आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने म्हटले आहे की, २०२३-२३ हंगामात भारताचे साखर उत्पादन ३.३ टक्क्यांनी कमी होऊन ३१.७ दशलक्ष टन होईल.

English Summary: Sugar export ban maintained Big decision of Central Government Published on: 18 October 2023, 01:17 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters