मागील काही दिवसात बाजारात टोमॅटो ला योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी रस्त्यावरच टोमॅटो फेकून देत होते आणि सर्वात विशेष बाब म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या येवला तालुक्यातील विंचूर चौफली गावातील एका शेतकऱ्याने रस्त्यावर टोमॅटो फेकून दिल्याने रस्त्यावर पूर्ण लाल चिखल तयार झाला.
शिमला मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाली:
टोमॅटो सारखीची परिस्थिती अत्ता शिमला मिरची ची झालेली आहे. बाजारात शिमला मिरची ला कसलाच दर भेटत नसल्याने येवला तालुक्यातील शिमला मिरची उत्पादक शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेला शिमला मिरची फेकून देऊन आपला संताप व्यक्त केला. बाजारात शिमला मिरचीला फक्त चार ते पाच रुपये दर भेटत होता आणि त्यामुळे आपला खर्च सुद्धा निघू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याने शिमला मिरची टाकून दिली.शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक बदल करून उत्पादन घेण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न सुद्धा केला मात्र त्याला ना निसर्गाची साथ लाभलेली आहे ना सरकारची साथ लाभलेली आहे. येवला मधील शेतकऱ्याने आपल्या शेतात एक वेगळा प्रयोग अवलंबला होता जे की यावेळी त्याने टोमॅटो चे पीक घेतल्यानंतर शिमला मिरचीचे पीक घेतले होते परंतु बाजारात शिमला मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झाली.
हेही वाचा:कांद्याच्या रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत
मात्र बाजारात शिमला मिरचीला कसलाच दर मिळालेला नाही तसेच पावसाने आपले सतत बरसने चालू केल्याने शिमला मिरचीला कसलाच भाव मिळाला नाही. अशा या बिकट संकटामुळे शेतकरी पूर्ण आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. या शेतकऱ्याने त्यांची शिमला मिरची येवला येथील बाजार समितीमध्ये घेऊन गेला होता मात्र तेथे त्याच्या ११ कॅरेट्स ला फक्त ३० ते ३५ रुपये भाव मिळाला होता. गेलेला खर्च जरी पदरात पडेल अशी आशा या शेतकऱ्यांची होती मात्र आर्थिक गणित पूर्णपणे ढासळल्यामुळे शेतकऱ्याने (farmer) शिमला मिरची रस्त्यावरच फेकून दिली.बाजारात शिमला मिरचीला प्रगती किलो २ आणि ३ रुपये भाव मिळत असल्याने जो लागवडीसाठी गेलेला खर्च आहे तो लांबच पण वाहतूक तसेच काढणी चा खर्च सुद्धा यामधून निघणार नसल्याने शेतकऱ्याने शिमला मिरची रस्त्यावरच फेकून दिली. बाजारात असा भाव बघून कुटुंब कसे जगवायचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे राहिले.
शिमला मिरचीला ४ रुपये भाव फक्त:
बाजारामध्ये दिवसेंदिवस वाढतच चाललेली भाजीपाल्याची आवक आणि अनियमित पणे झालेला पाऊस त्यामुळे पिकाचे नुकसान देखील झाले. मागील काही दिवसात टोमॅटो चे दर कोसळले तर आता शिमला मिरचीचे भाव त्यामुळे शेतकऱ्याने नक्की कोणता नवीन प्रयोग शेतात करावा असा प्रश्न पडलेला आहे.
Share your comments