सध्या कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून ऊस दरावरून आंदोलन सुरू आहे. असे असताना आता आसुर्ले-पोर्ले ता.पन्हाळा येथील दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याची पहिल्या उचलीबाबत घोषणा केली आहे. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दालमिया प्रशासन यांच्यात ऊस दराबाबत चर्चा झाली. यामुळे एफआरपीची पहिली उचल ३१०० रूपये घोषित केल्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दालमिया शुगरने यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिली उचल ३०७५ जाहिर केल्याच्या निषेधार्थ कारखान्याची ऊस वाहतुक बंद केली होती. शेतकरी संघटनेने यावेळी आंदोलन तीव्र केले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बिग ब्रेकिंग! ई-पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत..
या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्या गेट समोर साखर वाटून आनंद साजरा केला. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे ऊसाने भरून आलेल्या पाच वाहनांना गेट समोर आडवले आणि त्यांना परत पाठवले.
ऊस दराचे आंदोलन पेटले, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ट्रॅक्टरचे टायर फोडले..
दरम्यान, एफआरपीची पहिली उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये. असे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रसासनाला दिले होते. यामुळे यावर तोडगा निघणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनीही भविष्याचे नियोजन करावे! फक्त 200 रुपयांची गुंतवणूक आणि दरमहा 3000 पेन्शन
आता दूध उत्पादन वाढीसाठी आनंद पॅटर्न राबवणार, गोकुळची घोषणा..
सूतगिरणीच्या निवडणुकीतून बड्या नेत्यांची माघार, निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष..
Share your comments