1. बातम्या

असा घ्या बियाणे वाटप अनुदानाचा लाभ

शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी अनुदान तत्वावर बियाणे वाटप तसेच विविध प्रकारची कृषी अवजारे, ठिबक आणि तुषार सिंचन,कृषी पंप, पाइप इत्यादी साठी शासनातर्फे अनुदान दिले जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
seeds subsidy

seeds subsidy

 शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी अनुदान तत्वावर बियाणे वाटप तसेच विविध प्रकारची कृषी अवजारे, ठिबक आणि तुषार सिंचन,कृषी पंप, पाइप इत्यादी साठी शासनातर्फे अनुदान दिले जाते.

 या योजनेअंतर्गत यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी गहू, मका,हरभरा, करडई,  ज्वारी इत्यादी पिकांच्या बियाण्याच्या अनुदानासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.

 महाडीबीटी पोर्टल वर प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधने  इत्यादी घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे.

 ज्यामध्ये सन 2021-22 या वर्षासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिके सुधारित कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिक शेतकरी गटामार्फत राबवली जाणार असल्याने अर्ज करताना 10 हेक्टरशेती असणाऱ्या गटाने नोंदणी करावी. अर्ज करण्याची सुरुवातही30 ऑगस्टपासून होत असून शेवटची मुदत 10 सप्टेंबर 2021 ही आहे.

 कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या पिकासाठी ही योजना राबवली जाणार?

  • पौष्टिकतृणधान्य– नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर,सातारा, सांगली, कोल्हापूर,औरंगाबाद,जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड,परभणी,हिंगोली,बुलढाणा,अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ,वर्धा, गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली इत्यादी
  • गळीत धान्य – सांगली, बीड,लातूर, उस्मानाबाद, नांदेड,परभणी, हिंगोली, वाशिम,  चंद्रपुर

 

  • भरडधान्य ( मका )- नासिक,धुळे,जळगाव, अहमदनगर, सांगली,औरंगाबाद, जालना
  • कडधान्य ( हरभरा)- राज्यातील सर्व जिल्हे
  • गहू – सोलापूर, बीड, नागपूर

 शेतकऱ्याच्या एक एकच्या मर्यादित एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार रुपये 2000 ते चार हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान देण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी काढून निवड करणार आहेत.

 स्त्रोत – मी E-शेतकरी

English Summary: subsidy for the distibution of seeds Published on: 26 August 2021, 10:41 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters