तेरणा इंजीनियरिंग कॉलेज व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३१ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान पाच दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योजकतेची गोडी निर्माण व्हावी व आपल्या शिक्षणाचा उद्योजकता विकासामध्ये फायदा करून घेता यावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
दिवसेंदिवस वाढती महागाई व बेरोजगारी लक्षात घेता, सुशिक्षित तरुणांच्या नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या उद्देशाने धेनू टेक सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजकतेची संधी निर्माण व्हावी यासाठी धेनू ॲपचा डिजिमार्ट हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
या डिजिमार्टच्या माध्यमातून प्रत्येक होतकरू तरुण अगदी नाममात्र शुल्कामध्ये आपला व्यवसाय रजिस्टर करून डिजिटली घरबसल्या उत्पादने विक्रीच्या सेवा ग्राहकांना देऊन अधिकचा नफा कमवू शकतो यामध्ये त्या व्यावसायिकाला कोणतेही अधिकची आर्थिक गुंतवणूक करावी लागत नाही.
तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी ग्राहकांची वाट बघावी लागत नाही. अशी डिजीमार्टद्वारे व्यवसाय करण्याची संधी या प्रशिक्षणामधून माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..
उच्च शिक्षण सुरु असताना किंवा शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नोकरी न करता व्यावसायिक होण्याच्या विविध संधी आता उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची व व्यवसाय करण्याची जिद्द आहे या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण खूप फायदेशीर ठरणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणामध्ये डिजिटल उद्योजक, डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल प्रमोशन याशिवाय डिजिटल टेक्नॉलॉजी व त्याचा वापर यांसारख्या विविध बाबी हे प्रॅक्टिकली अनुभवायला व पाहायला मिळणार आहेत.
जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे
एवढेच काय तर उद्योजकतेसाठी लागणारे कलागुण व यशस्वी उद्योजकांच्या केस स्टडी अनुभवायला मिळतील तसेच या प्रशिक्षणामध्ये जे विद्यार्थी उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवतील अशा विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे नोकरीच्या संधी तसेच पुढील उद्योजकीय ज्ञान प्राप्त होण्याची संधी देखील मिळणार आहे.
पशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप आयोजित, दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल कार्यशाळा संपन्न...
Share your comments