1. बातम्या

श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी देत आहे शेतकी ज्ञानासोबतच मानवतेचा संदेश

आपत्ती आल्यावर प्रत्येक जण स्वतःचा जीव कसा वाचवावा यासाठी धडपडत असतो, परंतु स्वतः जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी धडपडणारे, अडचणीत सापडलेल्या इतरांसाठी कार्य करणारे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी याला अपवाद ठरत आहेत.

KJ Staff
KJ Staff
श्री शिवाजी कृषी महाविद्यालय

श्री शिवाजी कृषी महाविद्यालय

आपत्ती आल्यावर प्रत्येक जण स्वतःचा जीव कसा वाचवावा यासाठी धडपडत असतो, परंतु स्वतः जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी धडपडणारे, अडचणीत सापडलेल्या इतरांसाठी कार्य करणारे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी याला अपवाद ठरत आहेत.

करोना महामारी संकंटाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावरील गरजू लोकांना मदत करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिवाजी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना मार्फत गेल्या काही दिवसापासून अविरत करत आहत. 30 एप्रिल 20 21 पासून सुरू केलेले कार्य ज्यामध्ये अन्न शिजवणे, त्यांचे पॅकिंग करने, स्वखर्चाने बिस्किट, पाण्याच्या बाटल्या खरेदी करून त्याचे वितरण. कधी जेवणाचे साहित्य तर तर कधी बिस्किट व पाणी बॉटल इ. ते गरजूंना ते पुरवितात, तेही अत्यंत जिव्हाळ्याने. वेळ पडल्यास चिप्स व कुरकुरे यांचे वितरण करण्याचेही त्यांनी सोडले नाही. या प्रशंसनीय कार्यात आळी-पाळीने ते सहभागी होतात.

 

प्रत्येकाची कामे त्यांनी वाटून घेतली आहेत, या देवदूतांमध्ये शेख हुजीफा,अदनान काजी, पल्लवी रोंधळे, क्षितिजा वनवे, शेख नईम, दुर्गा भोपळे , जीशान शेख ,ऋषिकेश मनवर, शेख रहमान, विकास नागरे, शेख सुखियान, शितल दुर्वे, पायल परतेती, प्रतीक्षा मांडेकर, हर्षा नेरकर, गौरव गेडाम इत्यादी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. हे कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. दीपक पाडेकर यांच्या शिस्तीत अविरत सुरू आहे. राजापेठ, राजकमल जयस्तंभ, कॉटन मार्केट या परिसरात असंख्य निराधार वास्तव्य करतात. त्यांना आधार देण्याच्या या कार्याचे छाया नगर -हबीब नगर,गवळीपुरा येथील नगरसेविका हाफिजाबी यूसुफ शहा या युवकांचे तोंडभरून कौतुक करतात, या युवक-युवतींची प्रेरणा इतरांनी घ्यावी अशी त्यांची इच्छा असल्याचा त्या सांगतात.

महाविद्यालय बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेत असताना रिकामा वेळेचा उपयोग मोबाईल चाळत न बसता समाज कार्य करण्याचे मनसुबे ठेवून त्याची सुरुवात यापूर्वीच कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक निखिल यादव व त्यांच्या चमूने रक्तदान करून केलेली आहे . त्यांच्या या कार्यामुळे प्रेरित होऊन विध्यार्थी आपापल्या गावात राहून गावकऱ्यांचे लसीकरण नामांकन पासून ते लसीकरण केंद्रात पोहोचून देण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. यापूर्वीही महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय तसेच गाडगे नगर, पोलीस ठाणे येथील पोलीस बांधवांसाठी फेस-शिल्ड चे वितरण महाविध्यालया मार्फत करण्यात आले होते.

 

उपरोक्त कामात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जे.चिखले सर, रासयो अधिकारी डॉ.डी. जी. पाडेकर तसेच डॉ. सरप मॅडम यांचे मार्गदर्शन व सूचना समाजहितासाठी मोलाच्या ठरतात.
प्रतिनिधी गोपाल उगले
मो - 950353757

English Summary: Students of Shri Shivaji Agricultural College are giving the message of humanity along with agricultural knowledge Published on: 07 May 2021, 09:47 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters