स्वातंत्र्यववीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५,६ आणि ७ ऑक्टोबर या दरम्यान तीन दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्यमिता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये कृषिच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योजकतेची गोडी निर्माण व्हावी व आपल्या शिक्षणाचा उद्योजकता विकासामध्ये फायदा करून घेता यावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
बीएससी कृषीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतेक तरुण हे ग्रामीण भागामध्ये कृषी सेवा केंद्र चालू करतात परंतु, या कृषी केंद्रासाठी गुंतवणूकही फार मोठ्या प्रमाणावर लागते त्यामुळे काही तरुणांची इच्छा असतानाही गुंतवणुकी अभावी त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही.
अशा स्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढती महागाई व बेरोजगारी लक्षात घेता, सुशिक्षित तरुणांच्या नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या उद्देशाने धेनू टेक सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना तसेच बेरोजगार तरुणांना उद्योजकतेची संधी निर्माण व्हावी व आपले कृषी सेवा केंद्राचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी धेनू ॲपचा डिजिमार्ट प्लॅटफॉर्म म्हणजेच कृषीचे ऑनलाईन दुकान उपलब्ध करून दिले आहे.
या डिजिमार्टच्या माध्यमातून प्रत्येक होतकरू तरुण अगदी नाममात्र शुल्कामध्ये आपला व्यवसाय रजिस्टर करून डिजिटली घरबसल्या उत्पादने विक्रीच्या सेवा ग्राहकांना देऊन अधिकचा नफा कमवू शकतो यामध्ये त्या व्यावसायिकाला कोणतेही अधिकची आर्थिक गुंतवणूक करावी लागत नाही तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी ग्राहकांची वाटही बघावी लागत नाही.
अशी डिजीमार्टद्वारे व्यवसाय करण्याची संधी या प्रशिक्षणामधून माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. उच्च शिक्षण सुरु असताना किंवा शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नोकरी न करता व्यावसायिक होण्याच्या विविध संधी आता उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची व व्यवसाय करण्याची जिद्द आहे या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण खूप फायदेशीर ठरणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणामध्ये डिजिटल उद्योजक, डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल प्रमोशन याशिवाय डिजिटल टेक्नॉलॉजी व त्याचा वापर यांसारख्या विविध बाबी हे प्रॅक्टिकली अनुभवायला व पाहायला मिळणार आहेत.
तसेच या प्रशिक्षणामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवतील अशा विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सहा हजार रुपये किमतीचा डिजिमार्ट प्लॅन व भविष्यात नोकरीच्या संधी तसेच पुढील उद्योजकीय ज्ञान प्राप्त होण्याची संधी देखील मिळणार आहे.
श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात धेनूचा डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न...
Share your comments