खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा : उपमुख्यमंत्री

01 May 2020 06:17 PM


पुणे- देशात आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटात शेतकरी अन्नदाता आपले कर्तव्य बजावत आहे. बळीराजाला अधिकचा त्रास होऊ नये यासाठी सरकार विविध उपाय योजना करत आहे.  आता खरीप हंगाम येत असून राज्य सरकार शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत केली जाईल आणि त्यांच्या अडचणी कशा दूर होतील याचा आढावा घेत आहे. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची कामे सोपी व्हावीत यासाठी सरकार तयारी करत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  ते विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर आदींसह  लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  पुणे जिल्हयात २ लाख ३० हजार ९३७ हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी २६ हजार  क्विंटल बियाणांची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषी निवीष्ठा उपलब्ध करुन देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका. शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता दर्जेदार असावी  कृषी विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
source - Loksatta

Deputy Chief Minister ajit pawar ajit pawar Deputy Chief Minister Strict planning of kharif season खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा pune district Guardian Minister Ajit Pawar पुणे जिल्हा पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार खरीप हंगाम kharif
English Summary: Strict planning of kharif season: Deputy Chief Minister

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.