मुंबई: महाराष्ट्र सरकारने 2018 पासून राज्यव्यापी प्लास्टिक वस्तूंवरील बंदी अंशतः उठवली आहे. या अंतर्गत राज्य सरकारने गुरुवारी स्ट्रॉ, प्लेट्स, कप, ग्लास, काटे आणि कंटेनर यासारख्या एकेरी वापराच्या डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास परवानगी दिली. यामुळे राज्यभरातील रेस्टॉरंट, दुकाने आदींसह प्लास्टिक उत्पादक, व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र पर्यावरण विभागाने बुधवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. यासोबतच सरकारने न विणलेल्या पॉलीप्रॉपिलीन कॅरी-बॅगलाही परवानगी दिली आहे. जे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीसह 60 ग्रॅम प्रति चौरस मीटरपेक्षा जास्त नसावे.
आनंदाची बातमी! LIC ने आपल्या ग्राहकांसाठी सुरु केली नवीन सेवा; अनेक फायदे मिळणार
महाराष्ट्र सरकारने अशा प्लास्टिक वस्तूंचा वापर, साठवणूक, विक्री, वितरण आणि वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. नोटिफिकेशनमध्ये पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी आणि प्रति चौरस मीटर ६० ग्रॅमपेक्षा कमी प्लास्टिकच्या वस्तूंना सूट देण्यात आली आहे.
नवीन वर्षापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्तात होणार इतकी वाढ
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विभागाची बैठक झाली, जिथे सरकारने हा निर्णय घेतला.
यापूर्वी राज्य सरकारने रेस्टॉरंट उद्योगाद्वारे पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्लेट्स, चमचे, वाट्या, काटे आणि कंटेनर यांसारख्या सर्व एकेरी वापराच्या डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घातली होती.
मोफत रेशनबाबतचा नवा नियम देशभर लागू, करोडो लोकांना लागली लॉटरी!
Share your comments