एलईडीद्वारे मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी कडक कारवाई

14 August 2019 08:09 AM


मुंबई:
अवैधरित्या होणाऱ्या एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी केरळच्या धर्तीवर राज्याचा मासेमारी नियमन कायदा सुधारित करण्यात यावा. अशा पद्धतीने मासेमारी करणारे जहाज जप्त करण्याची तरतूद करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येथे दिले.

एलईडी दिव्यांच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने श्री. कदम यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर, प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त युवराज चौगुले आदी उपस्थित होते.

पारंपरिक मच्छिमारांचे हित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे असे सांगून श्री. कदम म्हणाले, एलईडी दिव्यांच्या सहाय्याने होणारी मासेमारी मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. त्यामुळे यास प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यात यावीत. यावेळी श्री. जानकर म्हणाले, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी पाहता आचारसंहितेपूर्वी अधिसूचना काढण्याचा पर्याय अवलंबण्यात यावा.

led fishing एलईडी मासेमारी रामदास कदम ramdas kadam मासेमारी नियमन कायदा fishing regulation act mahadev jankar महादेव जानकर
English Summary: Strict action to prevent fishing by LED

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.