राज्यात औद्योगिक क्षेत्राला दिवसा वीज देऊन शेतकऱ्याला मात्र रात्री वीज दिली जाते. याला बळीराजाचे राज्य कसे म्हणता येईल. या प्रकारामुळे कंपनीकडून दुजाभाव करून शेतकऱ्याला दुय्यम दर्जा दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा आठ तास वीज द्यावी या मागणीची दखल ताबडतोब घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला.
राज्यात ग्रामीण भागातच विजेचा प्रश्न निर्माण कसा होता. तर शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने दिवसा कमीत कमी आठ तास वीज द्यावी अशी मागणी सोलापूर जिल्हातील बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. राज्यात शेतकऱ्याला गृहीत धरून तसेच त्याच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता कृषी पंपासाठी रात्री वीज देण्यात येते. मात्र रात्रीच्यावेळी विजेच्या धक्क्याने तर हिंस्र् प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे कृषी पंपांना दिवसा विजेची मागणी जोर धरू लागली आहे.
रात्री-अपरात्री रानशिवारात वावरत असताना विषारी प्राण्यांचा दंश कळून येत नाही. त्यामुळे देखील अनेक शेतकरी दगावले आहेत. कर्ता पुरुष नसलेल्या घरात महिलांना शेताची कामे करावी लागतात. त्यामुळे महिला सुद्धा असुरक्षितरित्या जीव धोक्यात घालून करत असताना अशा माता-भगिनींचा विचार महावितरण कंपनीने न करणे म्हणजे खूप खेदजनक असल्याचे संघटनेने म्हंटले आहे.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष देविदास तळेकर, अनिल तेली, आजिनाथ इरकर, निलेश पडवळे, समाधान मारकड, हनुमंत राऊत, गणेश इवरे, शिवाजी बनकर, नंदूकुमार तांगडे, सुनील खारे, माऊली मेढे, लाला हुलगे, संपत गव्हाणे, भालचंद्र इवरे, प्रकाश काळे, बाळासाहेब माने, तुकाराम क्षिरसागर, नवनाथ कोळेकर उपस्थित होते. यासाठी आता शेतकरी आक्रमक झाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
सोयाबीन खरेदी करताना खासगी व्यापाऱ्यांकडून मापात पाप, धक्कादायक माहिती आली समोर..
शेतकऱ्याच्या अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा! पीक संरक्षणासाठी बनवले अनोखे जुगाड..
बातमी कामाची! आता गोवंश पालन करण्यासाठी सरकार देणार 25 लाखाचे अनुदान
Share your comments