1. बातम्या

अरे देवा! कारखान्याजवळील उसाच्या फडातचं उसाला आले तुरे; उस उत्पादक शेतकरी चिंतेत

पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड आपणास बघायला मिळेल. जिल्ह्यातील कराड तालुका कृष्णा आणि कोयना नदीच्या तीरी वसलेला असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा तालुका कृषी क्षेत्रात सधन म्हणुन ओळखला जातो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
sugarcane farm in satara district

sugarcane farm in satara district

पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड आपणास बघायला मिळेल. जिल्ह्यातील कराड तालुका कृष्णा आणि कोयना नदीच्या तीरी वसलेला असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा तालुका कृषी क्षेत्रात सधन म्हणुन ओळखला जातो.

तालुक्यात सहकारी साखर कारखाना आल्यापासून व जलसंधारण योजना अमलात आणल्या गेल्या पासून तालुक्‍यात पाण्याची कमतरता भासत नाही. यामुळेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात नगदी पिकाची विशेषता उसाची लागवड केली जाते. या भागातील ऊस (Sugarcane Rate) उत्पादक शेतकऱ्यांना  येथील सहकारी साखर कारखान्याचा मोठा फायदा होत असतो. परंतु या हंगामात तालुक्यात असलेल्या या सहकारी साखर कारखान्याचा (Sugar Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.

कारण की, सहकारी साखर कारखाना तालुक्यातच असून येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला तुरे आले आहेत. त्यामुळे दिव्याच्या बुडाखाली नेहमी आधार असते या उक्तीप्रमाणे येथील परिस्थिती झाली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. एकंदरीत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी उसाला तुरे आले असल्याने हतबल झाले असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. 

सातारा जिल्ह्यातील (Satara District) कराड तालुक्यात जवळपास चार सहकारी साखर कारखाने अस्तित्वात आहेत. कृष्णा सहकारी साखर कारखाना, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर मिल हे चार साखर कारखाने अस्तित्वात असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

सरकारनेदेखील तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. तालुक्यात सहकारी साखर कारखाने मुबलक असल्याने तसेच शासनाच्या प्रयत्नातून जलसंधारण योजना यशस्वीरीत्या राबविला गेल्याने उसाच्या क्षेत्रात वर्षानुवर्षे वाढ होत आहे.

सध्या मात्र तालुक्यातील अनेक गावात उसाला तुरे आले असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. उसाला तुरे आले असूनही अद्याप ऊस फडातच बघायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ऊस तोडणी लांबली असल्याचे सांगितले गेले. परंतु, अतिवृष्टीमुळे जास्तीत जास्त एक महिना ऊस तोडणीला विलंब झाला असता मात्र वास्तविक बघता तालुक्यात जवळपास तीन ते चार महिने ऊस तोडणी ला विलंब होत असताना बघायला मिळत आहे.

त्यामुळे याला अतिरुष्टी जबाबदार आहे की अजून कोणी याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते. तसेच उसाला तुरे आले असल्याने उसाच्या वजनात मोठी घट घडून येणार आहे त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट घटणार आहे मग या नुकसानीला जबाबदार कोण असणार हा देखील मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्ना त्यामुळे घट घडणार हे तर ठरलेलंच आहे मात्र, आता ऊस तोडणीसाठी मजूर वर्ग देखील शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे.

एकंदरीत परिस्थिती बघता या हंगामात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चहूबाजूने कुचंबणा केली जात असल्याचे सांगितले जातं आहे. खरं पाहता सहकारी साखर कारखानदारांनी ज्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रात गट ऑफिस तयार केले आहेत, या ऑफिस मध्ये असलेल्या नोंदणीच्या आधारावर साखर कारखानदारांना तोडणीचे नियोजन आखायचे होते मात्र हे केवळ नावापुरते व कागदावर लिहिण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

मोठी बातमी! 'या' कारणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे होणार चांगभलं; बांधावरच मिळणार खरेदीदार

Fertilizer Rate: शेती करणे महागणार म्हणजे महागणार! खतांच्या किंमती वाढणार हे ठरलेलंचं

शेतकऱ्याने केले वासराचं बारसं! बारसं करण्याचे कारण जाणुन तुम्हीही व्हाल भावुक

English Summary: still sugarcane is in farm near sugar factory in satara district Published on: 16 March 2022, 09:22 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters