MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. कृषी क्षेत्रापासून ते आयटी क्षेत्रापर्यंत सगळ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. आता कोरोनाचा परिणाम राजकीय वर्तुळावरही झाला आहे. कोरोनामुळे राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. कृषी क्षेत्रापासून ते आयटी क्षेत्रापर्यंत सगळ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे.  आता कोरोनाचा परिणाम राजकीय वर्तुळावरही झाला आहे. कोरोनामुळे राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात जुलै ते डिसेंबर २०२०दरम्यान घेण्यात येणाऱ्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगास नुकतीच करण्यात आली होती. यावर आयोगाकडून उत्तर आले असून आयोगाने स्थगितीस परवानगी दिली आहे. आयोगाकडून या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान १२ हजार ६६८  ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.  या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे.  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरू शकते.  शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबीं करता मोठा वेळ लागतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील ६ महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत विनंती राज्य शासनातर्फे राज्य निवडणूक आयोगास केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाच्या विनंतीस प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे की, निवडणूक आयोगाच्या १७ मार्च २०२० रोजीच्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर २०२०दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे.  ज्या ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.  तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरिल स्थगिती उठविण्याबाबत व निवडणूका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.

English Summary: states 12 thousand 668 gram panchayat's election postponed Published on: 04 June 2020, 06:31 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters