मुबई : राज्यातील ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली आहे. अवघ्या शंभर दिवसात कर्जमाफीचा निर्णय मार्गी लागला, यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे. राज्य सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसह आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे. ठाकरे सरकारने आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जमाफी केले आहे. याबाबतचे वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे.
दरम्यान शासन निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल तर सरकार त्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार आहे. हो अगदी खरं तुम्ही जे ऐकले ते अगदी खरं आहे. सरकार मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. शेतकऱ्यांनी जर परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल तर सरकार संबिधित सावकराला रक्कम देणार आहे. त्यामुळे सावकारी कर्ज घेतलेले शेतकरीही आता मोकाळा श्वास घेणार आहेत. बँकेतील कर्ज सत्तेत येणारे कोणतेही सरकार माफ करत असत. परंतु सावकारी कर्जाविषयी मात्र कोणी बोलत नाही. छोट- मोठ्या कामासाठी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत असतो. नेहमी-नेहमी बँकेचा दरवाजा ठोठावणं हे बळीराजाला शक्य नसतं. छोट्या कामासाठी बळीराजा सावकाराकडून कर्ज घेत असतो. याच संधीचा फायदा घेत सावकार चढ्या व्याजदराने कर्ज देत असतात.
यामुळे सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतीची अवस्था पाहिली असता हा निर्णय योग्य आहे. कारण येथे पावसाची अनिश्चिता अधिक असते. यामुळे येणाऱ्या आपल्या अल्प उत्पन्नातून अर्धा हिस्सा सावकराच्या हवाली करताना बळीराजाचे डोळे भरुन येत असतात. परंतु सरकारच्या हा निर्यण शेतकऱ्यांचे पाणावलेले डोळे पूसणारा आहे. यापूर्वी सावकाराने आपल्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेत अपात्र ठरवले होते. मात्र ही अट आता रद्द करण्यात आली आहे. यामुळे कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे, त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Share your comments