सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यात जो काही पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई पोटी मदतीची वाट पाहत असलेल्या राज्यातील 14 जिल्ह्यांना 15 डिसेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय घेऊन मदत मिळावी यासाठी 222 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे शेतकरी बाधित झालेले होते अशा शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून नागपूर विभागीय आयुक्त, अमरावती विभागीय आयुक्त आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी निधीची मागणी करण्यात आलेली होती व या पार्श्वभूमीवर हा शासन निर्णय घेऊन निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्याचे नाव आणि एकूण मिळालेला निधी
1- अमरावती- एकूण वितरित निधी 11 कोटी 45 लाख रुपये.
2- अकोला- एकूण वितरित निधी 34 कोटी 16 लाख रुपये
3- बुलढाणा- एकूण वितरित निधी 54 कोटी 15 लाख
4- वाशिम- एकूण वितरित निधी 26 कोटी 51 लाख
5- यवतमाळ- एकूण वितरित निधी 31 कोटी 82 लाख
6- अकोला( दुसऱ्या प्रस्तावानुसार )- वितरित करण्यात आलेल्या निधी 20 कोटी 27 लाख
7- यवतमाळ( दुसऱ्या प्रस्तावानुसार) वितरित निधी एक कोटी 35 लाख
8- नागपूर- एकूण वितरित निधी आठ कोटी 39 लाख
9- वर्धा- एकूण वितरित निधी एक कोटी 42 लाख
10- भंडारा- एकूण वितरित निधी 6 कोटी 49 लाख
11- गोंदिया- एकूण वितरित निधी 2 कोटी 89 लाख
12- चंद्रपूर- एकूण वितरित निधी 11 कोटी 98 लाख
13- गडचिरोली- एकूण वितरित निधी 24 लाख 62 हजार
14- सोलापूर( पुणे विभाग )- एकूण वितरित निधी चार कोटी 61 लाख 90 हजार
Share your comments