राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज 2022 -23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना भरभरून मदत केली असल्याचे दिसत आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये कृषिक्षेत्राला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची प्रोत्साहनपर मदतीची घोषणा करण्यात आली आहे.यासाठी दहा हजार कोटींची तरतूद सरकारने केली.राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येणार आहे.
अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठी नेमके काय मिळाले?
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 75 हजारांचे अनुदान मिळणार
- हिंगोली मध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा
- शेतकरी कल्याणासाठी अनुदानात वाढ.
- भरडधान्य यावर विशेष भर दिला जाणार आहे.
- दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणे.
- गोसीखुर्द प्रकल्प साठी निधीची तरतूद
- कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा.
- जलसंपदा विभागाला 13252 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
- शेततळ्याच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा
- पंतप्रधान सिंचन योजने मधून 11 प्रकल्प पूर्ण करणे.
- देशी गाई,बैलांची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यात तीन मोबाईल प्रयोगशाळा उभारल्या जाणार.
- मुंबईतील पशु वैद्यकीय महाविद्यालयांना 10 कोटींचा निधी दिला जाणार.
- एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग उभारण्याचे लक्षअसणार.
- दापोली व परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी दिला जाणार.
- बाजारपेठांच्या बळकटीसाठी दहा हजार कोटींची गुंतवणूक
- मुख्यमंत्र्यांना अन्नप्रक्रिया राबवण्यात येईल.
Share your comments