मागील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि महापुराचा जोरदार फटका बसला. यामध्ये शेतीसोबतच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
शेतीमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले अनेक ठिकाणी महापुरामुळे जमिनी खरडले गेल्या. या अतिवृष्टी आणि महापुराचा सर्वाधिक फटका हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला होता. दरम्यान सरकारने नुकसानभरपाईसाठी संबंधित नुकसानीचे पंचनामे केले होते.
त्याअनुषंगाने आता राज्यातील अतिवृष्टी बाधितांना 2019 सालच्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या सगळ्यांना दिलासा मिळणार आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापि अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाई च्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही
.त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्त दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारे नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापुरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टी बाधितांना दिलासा मिळणार आहे.
Share your comments