यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने सगळ्याच भागात पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या दिलासा देण्यात आला आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2021 साठी विविध पीक विमा कंपन्यांना राज्य शासनाच्या वतीने शासनाच्याहिश्याची रक्कम देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने राज्य सरकारने सहा विमान कंपन्यांना 973 कोटी 16 लाख 47 हजार 758 रुपये अदा केले आहेत. याबाबत तिचा शासन निर्णय झाला असून गरजे वेळी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. खरीप हंगामामध्ये पेरणी होताच पिक विमा भरून घेण्यास सुरुवात झाली होती. निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी यंदाही पीक विमा भरलेला होता. यावर्षी झालेल्या अति पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी राज्याना आशा आहे की विमा पोटी तरी रक्कम मिळेल. सध्या तरी राज्य शासनाने त्यांच्या हिश्याची रक्कम वर्ग केली आहे.
काही दिवसांमध्ये केंद्र सरकारही आपली रक्कम वितरित करणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना पिकाचा विमा मिळणार आहे.
नुकसानीचा दावा केल्यानंतरची प्रोसेस
- शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स अँप च्या माध्यमातून झालेल्या नुसार याची माहिती स्वतः भरायचे आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी हे पंचनामे साठी यासाठी बांधावर येणार आहेत.
- विमा कंपनीने 18004195004 टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारे शेतकरी आपल्या नुकसानीची ची माहिती सांगू शकता.
- तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरीही ऑफलाईन तक्रार दाखल करू शकता. कंपनीकडून देण्यात आलेल्या फार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.
- शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदविता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार चा अर्ज द्यावा लागणार आहे
- ज्या बँकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.
वरील पर्यायया सहा परिस्थिती मध्ये पडणार उपयोगी
स्थानिक नैसर्गिक आपत्ती, शेतजमीन जलमय झाल्यास तसेच गारपीट, ढगफुटी शिवाय वीज कोसळून लागलेली आग याप्रसंगी शेतकऱ्यांना या सापळ्यांचा उपयोग होणार आहे.
Share your comments