1. बातम्या

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतकऱ्यांना दिला हा मोलाचा सल्ला

सध्या कोळशाच्या टंचाई अभावी राज्यावर विजेचे संकट कोसळले आहे. अगदी बोटावर मोजता येईल इतकी दिवसच कोळशाचा साठा शिल्लक असून भविष्यात राज्यात वीज टंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
state energy minister prajakt tanpure give valuable advice to farmer

state energy minister prajakt tanpure give valuable advice to farmer

 सध्या कोळशाच्या टंचाई अभावी राज्यावर विजेचे संकट कोसळले आहे. अगदी बोटावर मोजता येईल इतकी दिवसच कोळशाचा साठा शिल्लक असून भविष्यात राज्यात वीज टंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याची  शक्यता आहे.

त्यामुळे भर उन्हाळ्यात राज्याला लोडशेडिंगचा झटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या वीज तयार करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते या पद्धतीमध्ये कोळशाचा वापर जास्त प्रमाणात होतो. कोळसा हा येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षात संपण्याची भीती आहे. त्यामुळे सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही.

नक्की वाचा:Cotton Rate: मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे कापसाच्या दरावर काय होणार परिणाम; वाचा कृषी तज्ञांचे मत

सौर उर्जेवर  चालणाऱ्या सौर पंपासाठी सध्या अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनीसौर पंप बसवून घ्यावे असा सल्ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. राहुरी तालुक्यामध्ये एका वीज उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा प्रारंभ प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. तसेच सध्या राज्यावर असलेल्या लोडशेडींग विषयी मत मांडताना त्यांनी म्हटले की  सध्याच्या लोडशेडिंगला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका देखील त्यांनी केली.

तनपुरे म्हणाले की सध्या राज्यावर वीज लोडशेडिंगचे  संकट कोसळणार मागे केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे.  केंद्र सरकारला वीज कंपन्यांचे खासगीकरण करायचे असल्यामुळे हे सरकार कंपन्यांचे अडवणूक करण्यात येत आहे. सध्यात्याची वाढती मागणी आणि त्या तुलनेत होत असलेला विजेचा तुटवडा यासाठी वीजनिर्मिती वाढविणे हाच एक महत्त्वाचा पर्याय आहे. सध्या कोळशाची  मोठ्या प्रमाणात टंचाई असल्यामुळे भारनियमन करण्याशिवाय पर्याय नाही.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना दिलेले चेक अनादर प्रकरणी जिनींगच्या अध्यक्ष , नितीन राजपूत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये देशातील कोळशाचे साठे संपतील. त्यामुळे सौर ऊर्जेशिवाय कुठलाही पर्याय नाही. 

शासनाकडून सौर पंपासाठी अनुदान योजना आहे त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी सौर उर्जेवर चालणारी कृषी पंप बसवावेतव त्यासोबत वीजबिल सवलत योजनेचा देखील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच मोठ्या प्रमाणात होणारी वीज गळती कमी करून जाळे विस्तारून पूर्ण दाबाने वीज देण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे.त्यासाठी वीज ग्राहकांची व शेतकऱ्यांची साथ हवी आहे असेही ते म्हणाले.

English Summary: state energy minister prajakt tanpure give valuable advice to farmer Published on: 17 April 2022, 03:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters