1. बातम्या

State Cabinet meeting : उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान मिळणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार येणार असून २ लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यात येणार आहेत. येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असन मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार असून पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत.

State Cabinet Meeting News

State Cabinet Meeting News

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज (दि.५) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असून मध उद्योगाला बळकटी देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार येणार असून २ लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यात येणार आहेत. येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असन मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार असून पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :

१) मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही
२) पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी
३) बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार
४) शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी
५) धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार
६) सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
७) स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता
८) बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार
९) कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता
१०) तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार

११) नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम
१२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार
१३) कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष
१४) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय
१५) गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद

English Summary: State Cabinet meeting Farmers will get subsidy for bamboo cultivation to increase income Published on: 05 February 2024, 03:50 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters