1. बातम्या

स्टेट बँक ऑफ इंडिया सेंद्रिय कापूससाठी सफल ला देणार कर्ज

KJ Staff
KJ Staff


'स्टेट बँक ऑफ इंडिया' मुख्यत्वे सेंद्रिय कापूस उत्पादकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या "SAFAL" ला  भरघोस मदत देण्यास इच्छुक आहे.  लवकरच लोन देण्यास सुरुवात करणार आहे,  असे देशातील सर्वात मोठी  बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने  जाहीर केले. व्यवसाय निर्मितीसाठी   बँक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) मोठ्या प्रमाणात वापरत आहे, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक सी एस सेट्टी यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) च्या आयोजित फिनटेक परिषदेत बोलताना सांगितले.

आम्हाला या तथाकथित रिटेल सेगमेंटच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यापर्यंत सर्व सुविधा  पोहचवायच्या  आहेत.  आमची बँक फक्त पीक कर्जच देत नाही  तर आम्ही सेफ अँड फास्ट एग्रीकल्चर लोन (सेफल) नावाचे उत्पादन बाजारात आणणार आहोत. सेफल अशी एक कंपनी आहे ज्याने सर्व सेंद्रिय कापूस उत्पादकांना  एकत्र आणले.  आणि ब्लॉकचेनच्या आधारे डेटाबेस तयार केला आहे.  याचा भविष्यात भरपूर फायदा होण्यास मदत मिळणार.

जगभरात कापसाचा कोणताही खरेदीदार खरोखरच सेंद्रिय कापूस विकत घेत आहे की नाही हे आम्ही या योजनेतून तपासू शकतो.  आम्ही  यासंदर्भात संपूर्ण डेटा घेत आहोत आणि त्यांना क्रेडिट लिंक प्रदान करीत आहोत . जे शेतकरी  सेंद्रिय कापूस पिकवण्यास इच्छुक आहेत त्यांना साहाय्य  करण्याची  आमची पूर्ण तयारी आहे . या योजनेद्वारे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही  त्यांना एकत्र आणले आहे आणि त्यांना बाजारपेठेची दृश्यता उपलब्ध करून दिली आहे, असेही ते म्हणाले.

एआय आणि एमएलच्या वापराचे आणखी एक उदाहरण देताना सेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान बँकेने १. ७ दशलक्ष पूर्व मंजूर कर्जे केली आहेत आणि २१ हजार  कोटी व्यवसाय या उत्पादनाखाली नोंदविले गेले आहेत. बँकेकडून डेटा टेकनॉलॉजिचा पूर्ण  निरीक्षण करून ते म्हणाले, आमचा एआय / एमएल विभाग हा एक प्रयोगशील विभाग नाही, तर तो व्यवसायभिमुख विभाग आहे. आमच्याकडे निव्वळ उत्पन्न निर्मिती  ११०० कोटी  इतकी आहे. सध्या बँकेकडे ४० हून अधिक मशीन लर्निंग आधारित मॉडेल आहेत जे  व्यवसायात  जोखीम कमी करणे, फसवणूक व्यवस्थापनासाठी आळा घालणे  यास मदत करतील.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters