अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा; कृषीराज्यमंत्र्यांचा आदेश

Thursday, 19 March 2020 05:09 PM
(प्रतिनिधिक छायाचित्र)

(प्रतिनिधिक छायाचित्र)


राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट होत असून याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची माहिती कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सांगलीमध्ये बोलत होते.

कोरोनाचा कृषी क्षेत्राला बसत असणाऱ्या फटक्याबाबतशी त्यांनी माहिती दिली. कोरोना व्हायरसमुळे जगातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतात व आपल्या राज्यातही याचा परिणाम जाणवत आहे. मात्र, तूर्त कोरोनाच्या परिस्थितीवर मात करणे हे ध्येय आहे. त्यानंतर नुकसानीच्या बाबतीत विचार होईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या संपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर याबाबतीत बोलणे योग्य होईल, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. याचा मोठा फटका फळबागा आणि रब्बी पिकांना बसला आहे. पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, संत्रा, केळी, लिंबू, डाळींब अशा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, गहू, हरभरा, मका या पिकांचीही खराबी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. परभणी, सांगली, लातूर, धुळे, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे.

state agriculture minister vishwajit kadam rain Hail storm sangli सांगली विश्वजीत कदम कृषी राज्य मंत्री अवकाळी पाऊस गारपीट
English Summary: state agriculture minister order for survey compensation

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.