1. बातम्या

कमी भांडवलात सुरू करा हे तीन व्यवसाय ; होईल लाखो रुपयांची कमाई

बहुतेकदा लोकांकडे एखादा सुरु व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते. भांडवल जमा कराचये म्हटले तर बॅकेकडून घ्यावे लागते. पण त्यातही अनेक अडचणी येत असतात. पण आता केंद्र सरकारने या गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. तुमचे हे स्वप्न आता अत्मानिर्भर भारत या मिशनच्या माध्यमातून साकार होऊ शकते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कमी  गुंतवणुकीतील व्यवसाय

कमी गुंतवणुकीतील व्यवसाय

बहुतेकदा लोकांकडे एखादा सुरु व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते. भांडवल जमा कराचये म्हटले तर बॅकेकडून घ्यावे लागते. पण त्यातही अनेक अडचणी येत असतात. पण आता केंद्र सरकारने या गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. तुमचे हे स्वप्न आता अत्मानिर्भर भारत या मिशनच्या माध्यमातून साकार होऊ शकते.

आजकाल लोकांना नोकरी करुन पैसा अपुरा पडतो. तेव्हा लोक कोणत्या तरी दुसऱ्या उत्पन्न मार्गाकडे वळतात. पण बहुतेकदा लोकांकडे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते आणि ते बॅकेकडून घ्यायचे झाले तरी अनेक अडचणींना सामोरे जाव लागते. पण आता केंद्र सरकारने या गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. तुमचे हे स्वप्न आता अत्मानिर्भर भारत या मिशनच्या माध्यमातून साकार होऊ शकते.या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून कर्ज दिले जात आहे. या माध्यमातून सरकार बंद असलेला व्यवसायला सुद्ध पुन्हा उभे करण्याची संधी देत आहे. पण त्याआधी कोणता व्यवसाय तुमच्यासाठी उपयुक्त आहे हे ठरवावे लागेल.

घरातून आणि कमी खर्चात सुरू करता येतील अशा सात ऑनलाईन कामांबद्दल माहिती घेऊ यात ब्रेड बनविण्याचा व्यवसाय ब्रेड मेकिंगची सुरुवात तुम्ही घरापासूनच करु शकता. तुम्ही ब्रेड बनवून ते बेकरी किंवा बाजारपेठेत सप्‍लाय करु शकता. हा सगळ्यात सोपा, कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीत होणारा व्यवसाय आहे. लॉकडाऊननंतर ब्रेड खाणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे.या व्यवसायासाठी  १०,००० रुपये खर्च येतो. ब्रेड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ किंवा मैदा, मीठ, साखर, पाणी, बेकिंग पावडर किंवा ईस्ट, ड्राई फ्रूट्स आणि मिल्क पावडर.

 

ब्‍लॉगपासून कमवा

जर तुमच्याकडे लिहिण्याचे कौशल्य असेल तर लॅपटॉप उचला आणि कामाला लागा, कारण तुम्ही ब्लॉगिंगमधूनही पैसे कमवू शकता. जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर ब्लॉगिंग सुरु केले  तर तुम्ही स्वत:ची वेबसाइटही तयार करु शकता. त्याच्या प्रमोशनसाठी खूप OPTION आहेत त्यामुळे काही महिन्यांतच तुम्ही कमवायला लागाल.

  • त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि मग वेबसाइट तयार करुन तुमच्या कामाची सुरुवात करावी लागेल. गुगलवर याचे शिक्षण देणाऱ्या अनेक वेबसाईट्स सापडतील. हे अभ्यासक्रम २१ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंत असतात. त्यानंतर तुम्ही डिजिटल प्रमोशनशी कनेक्ट करु शकता.  आपला व्यवसायाची सुरुवात करु शकता.

 

Online Classes ऑनलाईन क्लास

तुम्ही हुशार असाल आणि एखाद्या विषयात तज्ञ असाल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुरु करु शकता. बँक, SSC,CAKE मेकिंग, YOGA ते अगदी सिविल सर्विसची तयारी, हे सर्व ऑनलाईन केली जात आहे. असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे केवळ ऑनलाइन अभ्यासक्रमांमधून कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. सुरुवात करण्यासाठी याला फारसा खर्च ही येत नाही.

English Summary: Start these three businesses with low capital, will earn millions of rupees Published on: 19 March 2021, 10:38 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters