कोरोनाच्या काळात अनेकजणांचा रोजगार गेल्याने अनेकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. दरम्यान आता देशातील सर्व राज्य पुर्वपदावर येत आहेत. शहरातील अर्थचक्र फिरु लागले आहे. या लॉकडाऊनच्या काळात गावाकडे आलेल्यां काही लोकांनी आपला स्वता:चा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय करत आपला व्यवसाय सुरू केला. यातील काही व्यवसायाची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. या व्यवसायातून तुम्ही भरघोस कमाई करू शकतात. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान देखील दिले जाते.
(Tea and coffee business)चहा कॉफी स्टॉल –
देशातील सर्व राज्यात चहा आणि कॉफीचे सेवन केले जाते. यामुळे देशातील कोणताच असा भाग नाही कि, जेथे कॉफी किंवा चहा पिणारे लोक नाहीत. सर्व ठिकाणी चहा आणि कॉफीचा स्टॉल आपण लावू शकतो. या व्यवसायासाठी अधिक गुंतवणुकीची गरज नसते. हवी असल्यास आपण बँकेतून मुद्रा लोन या योजनेतून कर्ज काढून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रस्ताच्या बाजूला दुकाने लावणाऱ्यांना आणि छोट्या दुकानदारांना कमी कागदपत्राच्या पुर्तंतेवर कर्ज उपलब्ध देणारी योजना देखील आणली आहे. यातून आपण भांडवल जमा करुन आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
(Clothing business)कपड्यांचा व्यवसाय -
सर्वात चांगला व्यवसाय म्हणजे कपड्यांचा व्यवसाय. यात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. जर आपण खादी कपड्याचा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. कारण देशात सध्या स्वदेशी वस्तूंची क्रेझ निर्माण होत आहे. यात खादीच्या कपड्यांना मागणी वाढत आहे. या व्यवसायासाठीही आपण बँकेतून योजनेचा लाभ घेऊन कर्ज काढू शकतात, आणि आपला व्यवसाय वाढवू किंवा सुरू करू शकतात. कपड्याचे दुकान चालू करायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या दुकानाकडून कोटेंश काढावे लागते.
(Dairy Business) डेअरी व्यवसाय –
शेती व्यवसायासह करता येणारा व्यवसाय म्हणजे डेअरी व्यवसाय. या व्यवसायातून आपण बक्कळ नफा कमावू शकतात. डेअरी टाकून तुम्ही फक्त संकलन ही करू शकतात. किंवा डेअरी जमा होणाऱ्या दुधाचे पदार्थ तुम्ही बनवूही शकतात. दुधाच्या पदार्थांना मोठी मागणी आहे. यामुळे दुधासह तुम्ही दुग्धजन्य पदार्थांपासूनही पैसा कमावू शकतात. डेअरी व्यवसायासाठी नाबार्डमार्फत आपल्याला कर्जही मिळू शकतात. नाबार्डला आवश्यक गोष्टींची पुर्तंता केल्यास आपल्याला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत असते.
Share your comments