1. बातम्या

कमी गुंतवणुकीत सुरू करा पोहा मॅन्यूफॅक्चरिंग युनिट; कमवा लाखो रुपये

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


ज्या लोकांना स्वत: चा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. या लेखातून आपल्याला व्यवसायाच्या काही कल्पना सुचविण्यात आली आहे. हे व्यवसाय आपण फक्त २५ हजार रुपयात सुरू करु शकतात. पोहा फूड स्टॉल - पोहा हा साधरण प्रत्येक घरात नाश्तासाठी बनवला जाणार पदार्थ आहे. यामुळे पोह्याला नाश्तासाठी अनेकजण पसंती देतात. मुंबई - पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरात पोहा स्टॉल आपण जागोजागी पाहत असतो. हलका नाश्ता करण्यासाठी पोहा एक चांगला पर्याय आहे.   दरम्यान जर आपल्याला नाश्ता सेंटर सुरू करायचे असेल तर आपण पोहा स्टॉल सुरू करु शकतात. यातून नक्कीच आपल्याला नफा मिळेल. यात आपल्याला अधिक गुंतवणूक करण्याची गरजदेखील नाही.

 


(Loan for Poha Manufacturing Unit) पोहा मॅन्यूफॅक्चरिंग युनिटसाठी कर्ज

खादी विलेज इंडस्ट्रीज कमीशन (Khadi Village Industries Commission) खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमीशनच्या अहवालानुसार, पोहा मॅन्यूफॅक्चरिंग युनिट प्रोजेटसाठी २.४३ लाख रुपयांची गुंतवणूक असते. यासाठी सरकारकडून आपल्याला ९० टक्क्यापर्यंतचे कर्ज मिळते. आपल्याला फक्त १० टक्के रक्कमेची जुळाजुळव करावी लागते.  यासाठी आपल्या ५०० चौफूट जागा हवी. यासाठी साधरण १ लाख रुपयांचा खर्च येईल. यासाठी पोहा मशीन, सिक्स, भट्टी, पॅकिंग मशीन, ड्रम वैगरे यासाठी १ लाख रुपयांचा खर्च येईल. जागेसाठी एक लाख आणि साहित्यासाठी १ लाख असे दोन लाख रुपयांचा खर्च आपणांस येईल.  तर भांडवलसाठी आपल्याला ४३ हजार रुपयांचा खर्च करावा लागेल. कच्चा माल घेण्यासाठी आपल्याला अधिक खर्च येत असतो. कच्चा मालसाठी साधरण ६ लाख रुपये खर्च येईल.

 

यातून आपण १ हजार क्किंटल पोहाचे उत्पादन करु शकतो. उत्पादित झालेला एक हजार क्किंटल पोहा आपल्याला १० लाख रुपयांची कमाई करुन देईल. म्हणजे आपल्याला १.४० लाख रुपयांचा नफा मिळेल. जर आपण ग्रामोद्योग रोजगार योजनेच्या अंतर्गत कर्ज घेत असाल तर आपल्याला ९० टक्के कर्ज मिळू शकते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters