1. बातम्या

उन्हाळ्यात सुरू करा आरओ वाटर प्लांटचा व्यवसाय

जर पाण्याचा विचार केला तर जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण आहे. म्हणून पाण्याला जीवन म्हटले जाते. परंतु शुद्ध पाणी प्यायला मिळणे हे सुद्धा आरोग्यासाठी तेवढेच आवश्यक आहे. पाण्याचा व्यवसाय करून सुद्धा चांगल्याप्रकारे पैसा कमावता येऊ शकतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
आरओ वाटर प्लांट

आरओ वाटर प्लांट

जर पाण्याचा विचार केला तर जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण आहे. म्हणून पाण्याला जीवन म्हटले जाते. परंतु शुद्ध पाणी प्यायला मिळणे हे सुद्धा आरोग्यासाठी तेवढेच आवश्यक आहे. पाण्याचा व्यवसाय करून सुद्धा चांगल्याप्रकारे पैसा कमावता येऊ शकतो.

आपल्याला माहितीच आहे. म्हणूनच भारतामध्ये मिनरल वॉटर चा व्यवसाय वाढतच जात आहे. तर बाजारात आपण विचार केला तर एक रुपयाच्या पाणी पाऊस पासून तर 20 रुपयाच्या पाण्याच्या बाटली पर्यंत मिनरल वॉटर उपलब्ध आहे. या लेखामध्ये आपण व्यवसायाला सुरू करण्याविषयी माहिती घेऊ.

  कशी करावी या व्यवसायाची प्लॅनिंग?

  • तर तुम्हाला मिनरल वाटर चा व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात आगोदर एक कंपनी स्थापन करावी लागते.

  • कंपनीचे रजिस्ट्रेशन कंपनी ऍक्‍टनुसार करावे लागते.

  • आपण केलेल्या कंपनीचा पॅन नंबर आणि जीएसटी नंबर घ्यावा लागतो. कारण या अत्यावश्यक आहे.

  • बोरिंग, आरो आणि चिल्लर मशीन आणि टॅंक  ठेवण्यासाठी 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असते.एवढ्या जागेमध्ये पाण्याच्या साठवणुकीसाठी असलेल्या टाक्या ठेवू शकतो.

 वॉटर प्लांट कसा लावावा?

  • यात महत्त्वाचे म्हणजे अशा जागेची निवड करावी की जिथे पाण्याची टीडीएस लेवल जास्त असणार नाही.

  • नंतर काही प्रकारचे लायसन्स आणि महत्वाचे म्हणजे आयएसआय नंबर लागतो. तो मिळवावा लागतो

  • काही कंपन्या कमर्शियल आरो प्लांट बनवतात. त्यांची किंमत 50 हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत असते.

  • त्यासोबतच कमीत कमी वीस लिटर क्षमतेचे शंभर जार खरेदी करावी लागतात.

  • सगळ्या मिळून खर्च हा चार ते पाच लाख रुपयांपर्यंत येतो.

  • त्यासाठी तुम्ही बँकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकता.

  • जर तुमचा प्लांटमध्ये एका तासात हजार लिटर पाणी शुद्ध होते, तर तुम्ही कमीत-कमी 30 ते 50 हजार रुपये कमवू शकतात.

 

 प्लांटसाठी लोन कुठे मिळेल?

 तुम्हाला आरो प्लांट लावायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकारी आणि निम-सरकारी बँकेकडून कर्ज सुविधा उपलब्ध आहे, तुम्ही कमीत कमी 10 लाख रुपयांपर्यंतचा लोन बँकेकडे घेऊ शकता. स्टेट बँकेकडून मुद्रा लोन सुद्धा मिळते जर तुमच्याकडे दीडशे रेगुलर कस्टमर आहेत. आणि प्रत्येक व्यक्ती एक शुद्ध पाण्याचा एक जार तुमच्याकडून घेतो. आणि एका जारची किंमत जर 25 रुपये आहे. तर तुम्ही सहजतेने 1 लाख 12 हजार 500 रुपये पर्यंतच्या कमाई करू शकतात. यामध्ये कामगारांची पगार, भाडे,विज बिल इ. खर्च कपात केला तर निव्वळ नफा 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत मिळतो.

 

डीलरशिप घेऊन करा व्यवसाय

 मिनरल वॉटर व्यवसायमध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या कंपन्या आहेत. जसे की बिसलेरी, एक्वा फिना इत्यादी. हे अशी ब्रांड आहेत की त्यांच्या 200 एमएल पासून तर एक लिटरपर्यंत पाणी बॉटल उपलब्ध आहेत. आणि या ब्रॅण्डची भरपूर प्रमाणात मागणी सुद्धा आहे. तसेच ज्या कंपन्या 20 लिटर जार सुद्धा सप्लाय करतात. तुम्ही या कंपन्यांची डिस्ट्रीब्यूटर शिप घ्यायची ठरवली तर तुम्हाला त्यासाठी 5 ते 10 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. परंतु यामध्ये तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

 यात अनेक कंपन्या आहेत, जसे की बिसलेरी, एक्वा फिना इत्यादी. हे अशी ब्रांड आहेत की त्यांच्या 200 एमएल पासून तर एक लिटरपर्यंत पाणी बॉटल उपलब्ध आहेत. आणि या ब्रॅण्डची भरपूर प्रमाणात मागणी सुद्धा आहे. तसेच ज्या कंपन्या 20 लिटर जार सुद्धा सप्लाय करतात. तुम्ही या कंपन्यांची डिस्ट्रीब्यूटर शिप घ्यायची ठरवली तर तुम्हाला त्यासाठी 5 ते 10 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. परंतु यामध्ये तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

English Summary: Start a RO water plant business in the summer Published on: 09 February 2021, 01:05 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters