1. बातम्या

मुद्रा योजनेच्या मदतीने सुरू करा बेकरी उद्योग ; होईल लाखो रुपयांची कमाई

सध्याच्या काळामध्ये नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. दरवर्षी हजारो प्रमाणात सुशिक्षित युवकांचे लोंढे विविध शिक्षण संस्थांमधून बाहेर पडत आहेत. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित लोकांना नोकऱ्या उपलब्ध करणे शक्य नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या जटिल समस्या वर जालीम उपाय म्हणजे उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे व सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योगाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणे हे होय.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
बेकरी उद्योगातून मिळणार बक्कळ पैसा

बेकरी उद्योगातून मिळणार बक्कळ पैसा

सध्याच्या काळामध्ये नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. दरवर्षी हजारो प्रमाणात सुशिक्षित युवकांचे लोंढे विविध शिक्षण संस्थांमधून बाहेर पडत आहेत. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित लोकांना नोकऱ्या उपलब्ध करणे शक्य नाही.  त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या जटिल समस्या वर जालीम उपाय म्हणजे उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे व सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योगाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणे हे होय.

अनेक छोटे छोटे उद्योग आहेत, जे चांगल्या प्रकारे आर्थिक स्थैर्य देऊ शकतात. त्यापैकी एक म्हणजे बेकरी उद्योग. त्याविषयी या लेखात आम्ही माहिती देणार आहोत. जर तुम्हाला बेकरी उद्योगांमध्ये पडायचे असेल तर सगळ्यात आगोदर तुम्हाला तपशीलवार माहिती असणे आवश्यक असते. बेकरी उद्योगासाठी सरकार तुम्हाला विविध प्रकारच्या कर्ज योजना योजनांद्वारे मदत करते. जर तुम्हाला हा व्यवसाय मुद्रा योजनेद्वारे सुरु करायचा असेल तर तुम्हाला केवळ एक लाख रुपये गुंतवणे आवश्यक असते.  या उद्योगासाठी चा लागणारा प्रकल्प अहवाल असता सरकारने तयार केला असून सरकारने केलेल्या रचनेनुसार खर्च कमी केल्यावर तुम्हाला दर महिना 30 हजार रुपयांची कमाई होऊ शकते.

 बेकरी उद्योग प्रकल्पासाठी लागणारा खर्च

 जर एकंदरीत बेकरी प्रकल्प उद्योगाच्या खर्चाचा विचार केला तर या प्रकल्पासाठी एकूण पाच लाख तीस हजार पर्यंत खर्च येतो.  स्वतःच्या गुंतवणुकीचा विचार केला तरत्यामध्ये तुम्हाला स्वतःचे एक लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. जा तुम्ही या उद्योगासाठी मुद्रा योजने द्वारे अर्ज केला असेल तर आणि तुमची निवड झाल्यास तुम्हाला दोन लाख 87 हजार मुदत कर्ज आणि वर्किंग कॅपिटल म्हणून एक लाख 49 हजार रुपये मिळतात.  या प्रकल्पासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता भासते. तुमच्याकडे जवळजवळ पाचशे चौरस फुट  स्वतःची जागा असणे फार आवश्यक आहे. जर तेवढी जागा नसेल तर ते भाडेपट्ट्याने घ्यावी लागते. कारण प्रकल्पाची फाईल बनवण्यासाठी जागा दर्शवणे आवश्यक असते.

 

या उद्योगात मिळणारा नफा

 या उद्योगाचा प्रकल्प अहवाल हा शासन तयार करत असल्यामुळे त्या अहवालानुसार एकूण वार्षिक उत्पादन आणि विक्री चे अंदाजे पाच लाख 36 हजार गृहीत धरल्यास अंदाजे खर्च पुढील प्रमाणे.

  • वर्षभरात उत्पादन तयार करून विक्री केली तर विक्रीवर 20.38 लाख रुपये मिळतील. डिग्री उत्पादनांची विक्री किंमत इतर वस्तूंच्या दराच्या आधारे काही कमी करून निश्चित केलेली आहे.
  • सहा लाख 12 हजार रुपये एकूण ऑपरेटिंग नफा
  • 70000 प्रशासन आणि विक्री वरील खर्च
  • साठ हजार रुपये बँक कर्जाची व्याज
  • 60000 इतर खर्च. हा सगळा खर्च वजा जाता निव्वळ नफा हा वर्षाकाठी चार लाख 2 हजार रुपये मिळतो.

 

मुद्रा योजनेत कसा कराल अर्ज?

 या उद्योगासाठी तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कुठल्याही बँक शाखेत अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक बँकेत न फॉर्म घेऊन तो भरावा लागतो. त्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती जसे की स्वतःचे नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, तुमच्या शिक्षण,  तुमचे सध्याचे उत्पन्न त्याची तपशीलवार माहिती भरावी लागते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया शुल्क भरण्याची गरज नाही. मुद्रा योजना अंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड 5 वर्षात करू शकतात.

  

English Summary: Start a bakery industry with the help of Mudra Yojana, will earn millions of rupees Published on: 16 March 2021, 03:27 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters