1. बातम्या

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. 15 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. 15 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये 33 टक्के ते 100 टक्के पर्यंत सवलत देते.

या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने यापूर्वीच सुरू केलेली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला दिनांक 15 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, असेही श्री. परब यांनी सांगितले.

English Summary: ST smart card scheme extended till August 15 Published on: 05 May 2020, 10:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters