1. बातम्या

खेळाडूंनी लावला टाईमर; पावसाआधी पु्र्ण करणार गहू कापणीची कामे

कोरोना विषाणूमुळे जगात लॉकडाऊन झाले असून अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. यातून क्रिडा जगतही सुटलेले नाही, मात्र कृषी क्षेत्राचे काम चालू आहे.

KJ Staff
KJ Staff
photo- lokmat

photo- lokmat


कोरोना विषाणूमुळे जग लॉकडाऊन झाले असून अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत.  यातून क्रिडा जगतही सुटलेले नाही, मात्र कृषी क्षेत्राचे काम चालू  आहे. पंरतु लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  अनेकांना पीक कापणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने आता शेतकरी कुटुंबातील काही खेळाडू आता थेट शेतात उतरले असून कामे करत आहेत. पॅरालिम्पिक अॅथलिट रिंकू हुडा, स्टार बॉक्सर अमित पंघाल, आणि मनोज कुमार तसेच हॉकीपटू पूनम मलिक यांनी आपल्या शेतात कामे सुरु केली आहेत. याविषयीची बातमी लोकमत या वृत्तसंस्थेने दिली आहे.

 


रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता रिंकू हुडा गहू कापणीचे काम करत आहे. 'मशीनच्या मदतीने गहूची कापणी करण्याचे माझे काम आहे. ९ एकराच्या गहू कापणी मशीनद्वारे पूर्ण झाली आहेत. आता अर्धा एकरची कापणी शिल्लक आहे, पावासाच्या आधी गव्हाची कापणी पूर्ण होईल', असे रिंकू हुडाने सांगितले.  तर मुष्टीयुद्ध खेळाडू अमित पंघाल म्हणतो की, शेतकरी पूत्र असल्याने शेतात काम केल्याने समाधान मिळते. अमित रोहतक येथे राहत असून तेथील आपल्या शेतात तो शेतीचे कामे करत आहे.  नेहमी आपण परिवाराची न सांगता मदत करत असतो.  बॉक्सिंगमुळे मला दरवेळी गहू कापणीच्या वेळी गावाबाहेर राहावे लागले आहे,  मात्र आता लॉकडाऊनमुळे मी माझ्या गावी  राहून गहू कापणीचे कामे करत असल्याचे सांगितले.   हॉकीपटू  पूनम मलिकही आपल्या उमरा गावात असून आपल्या शेतात काम करत आहे.  गहू कापणीसाठी मजूरही उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे परिवारासह शेतात जाऊन मी गहू कापणीचे काम करत असल्याचे सांगितले.  विशेष म्हणजे पूनम पहिल्यांदाच कापणीचा अनुभव घेत आहे.

English Summary: sports player set timer ; Wheat harvesting work to be completed before rains Published on: 02 May 2020, 04:57 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters