भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला उत्पादक देश आहे. भारत हा केवळ उत्पादकच नाही तर मसाल्यांच्या निर्यातीतही आघाडीवर आहे. भारतातून अनेक देशांमध्ये सर्वाधिक मसाले निर्यात केले जातात. आपल्या देशात मसाल्यांच्या उत्पादनासाठी अनुकूल वातावरण आणि नैसर्गिक संसाधने असल्यामुळे देशात सुमारे 75 प्रकारच्या मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते. पण मसाले उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामूळे आता कृषी जागरण अशा शेतकऱ्यांना एक वेगळी ओळख देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. हा कार्यक्रम डिसेंबर 2023 मध्ये आयोजित केला जाणार असून महिंद्रा ट्रॅक्टर्स मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया 2023 असे या कार्यक्रमाचे नाव आहे.
महिंद्रा ट्रॅक्टर्स मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया 2023 या कार्यक्रमामध्ये कृषी जागरणद्वारे शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जातील. जर तुम्ही देखील मसाले उत्पादन करत असाल किंवा इतर पिकांची लागवड करत असाल आणि वार्षिक 10 लाखांपेक्षा जास्त कमाई करत असाल, तर तुम्ही मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया या वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकता. या कार्यक्रमाविषयी सविस्तर महिती जाणून घेऊया-
प्रदर्शकांसाठी फायदे -
या कार्यक्रमात लक्षाधीश शेतकरी, कृषी व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि धोरण निर्मात्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कृषी उद्योगातील विस्तृत ब्रँड डिस्प्ले, नवीन उपकरणे आणि मशीन्सची माहिती मिळेल.
अत्याधुनिक उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचा परिचय आणि प्रचार करण्यासाठी हे एक आदर्श व्यासपीठ ठरेल.
नोंदणी कशी करावी -
तुम्ही कृषी जागरणच्या महिंद्रा ट्रॅक्टर्स MFOI कार्यक्रमात अद्याप नोंदणी केली नसेल, तर आजच मिलिनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स वेबसाइट https://millionairefarmer.in ला भेट देऊन अर्ज करा. जेणेकरून तुमची देशातील लक्षाधीश शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आणि इतर अनेक अधिकाऱ्यांसोबत भेट होईल आणि शेतीमधील नवीन कल्पनांबद्दल आणि नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळेल.
Share your comments