राज्यात समृद्धी महामार्ग हा सर्वात मोठा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. मुंबई ते नागपूर असा हा रोड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यात आले. याचे उद्घाटन नुकतेच झाले. मोठा गाजावाजा यावेळी करण्यात आला.
असे असताना या रोडचे काम केलेल्या मजुरांना पैसे मिळाले नाहीत, यामुळे याची चर्चा सुरू आहे. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुरांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मजुरांनी कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील या 300 च्या वर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीमार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करत होते.
ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
त्यांनी काम करून देखील त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे तीनशे मजुरांनी किनगावराजा 15 किमी पायी जाऊन काल सायंकाळी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. असे असताना मजुराचा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा करण्यात आली.
जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःलाच जमिनीत गाडून घेतले, शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
यावेळी पुढील आठवड्यात मजुराच्या खात्यात त्यांचे वेतन दिले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र कामगार आंदोलनावर ठाम आहेत. कंपनीचे जे पी सिंग यांनी एम एस आर डी सी ने अद्याप पर्यंत पैसे न दिल्याने कामगारांचे पैसे देता आले नाही. त्यामुळे या तीनशे मजुरांचे अडीच कोटी रुपये देणे बाकी असल्याचे ही सिंग यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, सौर ऊर्जा प्रकल्पाना दिली चालना...
बारामतीत सुरू होतेय नवीन कृषिपर्व! वॉशिंग्टन नंतर जगातील दुसरे संशोधन केंद्र बारामतीत, शरद पवार, ऑक्सफर्डचे संचालक उपस्थित
समृद्धी महामार्गाची खरी कहाणी! आलिशान गाड्या, कोट्यावधीचे बंगले आणि बक्कळ पैसा, शेतकरी मालामाल
Share your comments