1. बातम्या

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

KJ Staff
KJ Staff


मुंबई: 
राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावीया उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषी पंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती, मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हीडिओ उपलब्ध असणार आहेत. तसेच या योजनेमध्ये सौर कृषी पंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात.

या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता इलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून हिंस्त्र पशूप्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होईलअसेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ऊर्जा सचिव अरविंद सिंहमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

English Summary: Special Portal to CM Agricultural Solar Pumps Scheme Published on: 18 January 2019, 08:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters