राज्य शासन पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळीतधान्य उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या 524 कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत संबंधितांना दिले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात तत्कालीन मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोयाबीन व कापूस पिकांसाठी सन 2022 ते 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत 1 हजार कोटींची विशेष कृती योजना राबवण्यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा आढावा आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत घेतला.
या योजनेअंतर्गत पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणी, बियाणे साखळी बळकटीकरण तसेच मूल्यसाखळी विकास या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये भुईमूग, करडई, जवस, तीळ, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे, कार्यशाळा घेणे, विद्यापीठ स्तरावरील संशोधन व बियाणे साखळी बळकटीकरण व आदर्श प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करणे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बळकटीकरण करणे.
त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणे बीज प्रक्रिया युनिट निर्माण करणे, शेतकरी उत्पादक गटांना/कंपन्यांना ड्रोन खरेदी व ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यासाठी अनुदान/ अर्थसहाय्य देणे, शेतकऱ्यांच्या बांधांवर जैविक निविष्ठा निर्मिती करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना कमोडिटी मार्केटशी जोडण्याकरिता अर्थसहाय्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड, भारत सरकारच्या एक निर्णय आणि जगभरात खळबळ..
कापूस सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादनात आघाडीवर असलेले जिल्हे निवडून त्या जिल्ह्यांमध्ये वरील सर्व कार्यक्रम युद्ध पातळीने राबवावे तसेच या कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 524.19 कोटी इतक्या निधीचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सरकारकडून हालचाली, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महत्वाचे आदेश...
सोमेश्वर कारखान्याने ३,५५० रुपये दर द्यावा, जाणीवपूर्वक दोनशे रुपये दर कमी केला- सतीश काकडे
इंदापूरमध्ये लाईट शिवाय चालते मोटार, शेतकऱ्यांचा जुगाड, विजेची होणार बचत....
Share your comments