खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या बाजारभावात या हंगामात मोठा चढ-उतार बघायला मिळाला. सोयाबीनचे बाजारभाव मुहूर्ताचा कालावधी वगळता सुरुवातीला मोठा नगण्य होता. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या योग्य आणि साहसी निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात मध्यंतरी वाढ झाली होती. दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर पाच हजारांच्या घरात स्थिर होते मात्र त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्याचा साहसी निर्णय घेतला, शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठी मंदावली बाजारपेठेत मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने सोयाबीनचे बाजार भाव मध्यंतरी चांगलेच कडाडले होते.
परंतु आता गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजार भाव सहा हजाराच्या आसपासच रस्सीखेच खेळत होते. आता सोयाबीनच्या बाजारभावात थोडी वाढ झाली आहे. सोयाबीनचे बाजार भाव उस्मानाबाद जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यात सात हजारांच्या घरात गेले आहेत.
हे पण वाचा हो:- ऐकलंत का! 'या' तारखे पासून होणार हमीभावात हरभऱ्याची खरेदी; जाणून घ्या सविस्तर
या ठिकाणी सोयाबीन सात हजारांच्या घरात
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एपीएमसीमध्ये सोयाबीनला 6 हजार 900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा उच्चांकी बाजारभाव प्राप्त झाला. सोयाबीनच्या बाजारभावात हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढ झाल्याने अनेक तज्ञांनी मार्चमध्ये सोयाबीनचे बाजारभाव 8 हजारांचा पल्ला गाठतील असा अंदाज वर्तवला आहे. जागतिक बाजारपेठेत सोयाबीनचा पुरवठा करण्यासाठी भारत एक प्रमुख सूत्रधार म्हणून उदयास आला आहे, भारतातून फ्रान्स, जर्मनी, बांगलादेश, इंडोनेशिया या देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीन निर्यात केला जात आहे. जागतिक बाजारपेठेत भारताच्या सोयाबीनला मागणी वाढल्याने देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच कळंब एपीएमसीमध्ये मंगळवारी सोयाबीनला सहा हजार 900 रुपये पर्यंतचा उच्चांकी दर प्राप्त झाला.
शेतकऱ्यांनो हे वाचा:- आनंदाची बातमी! मोदी सरकारचा 'हा' निर्णय देखील कांद्याच्या वाढत्या दराला थांबवू शकला नाही; जाणुन घ्या बाजारपेठेतील चित्र
बर्डफ्लू मुळे सोयाबीनच्या दरात होणार का कपात?
कळंब एपीएमसीमध्ये या चालू वर्षात सव्वा लाख क्विंटल सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली. यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सर्वात जास्त सोयाबीनची आवक बघायला मिळाली. या दोन महिन्यात 51 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असल्याचे बाजार समितीत नमूद करण्यात आले. तद्नंतर मात्र सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक बाजारपेठेत झाली आणि म्हणूनच सोयाबीनचे दर खाली आलेत. त्यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी देखील बाजारपेठेतील गणित ओळखून सोयाबीनची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. सध्या देशात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू चा आजार वेगाने पसरत आहे, राज्यात देखील या आजाराने पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडून ठेवले आहे त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या खरेदीत मोठी मंदी नमूद करण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या सोयाबीनला विशेष मागणी आल्याने सध्या बाजारपेठेत सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. एवढेच नाही तर आगामी काही दिवसात विशेषता मार्च महिन्यात सोयाबीनचे दर आठ हजार रुपयांच्या घरात जातील असा तज्ञांचा अंदाज आहे. असे सांगितले जाते की, देशातील सर्व एपीएमसीमध्ये कोटा या बाजारपेठेतून सोयाबीनचे दर ठरत असतात याच बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी सोयाबीनला 7200 एवढा कमाल दर प्राप्त झाला. त्यामुळे सोयाबीनच्या दरात अजून वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील हंगामात सोयाबीनने जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला होता, मागील हंगामातील हा मॅजिक फिगर या हंगामात देखील बघायला मिळेल का? हे विशेष बघण्यासारखे असणार आहे.
उन्हाळी सोयाबीनमुळे बाजारभाव पडणार का?
उन्हाळी हंगामात यावेळी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली गेली आहे, उन्हाळी हंगामातील सोयाबीन एप्रिल मध्ये बाजारपेठेत दाखल होणार आहे त्यामुळे जुन्या अर्थात खरीप हंगामातील सोयाबीनचे बाजार भाव पडतील अशी धाकधूक शेतकऱ्यांच्या मनात आहे. परंतु शेतकर्यांच्या या आशँकेला जाणकारांनी पूर्णविराम लावला आहे, जाणकारांच्या मते, परदेशात भारतीय सोयाबीनला मोठा डिमांड आला आहे त्यामुळे बाजारपेठेत कितीही सोयाबीन आले तरी सोयाबीनचे बाजार भाव सात हजाराच्या आसपास स्थिर राहतील. जागतिक बाजारपेठेत तयार झालेले चित्र बघता भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
Share your comments