1. बातम्या

ऐकलंत का! 'या' तारखे पासून होणार हमीभावात हरभऱ्याची खरेदी; जाणून घ्या सविस्तर

सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील हरभरा पीक काढणीसाठी तयार आहे. अनेक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हरभरा विक्रीसाठी देखील आणला आहे. सध्या राज्यात कुठेच हमीभाव केंद्रांत प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली नाही. लातूर जिल्ह्यात देखील हरभऱ्याची हमीभाव केंद्रावर अजून खरेदी केली जात नाहीये, मात्र नाफेड अंतर्गत येणाऱ्या खरेदी केंद्रांवर हरभरा पिकासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी लातूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ पाच हजार हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी केल्याचे समोर आले आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
gram

खरेदी केंद्राला अनेक हरभरा उत्पादक शेतकरी विशेष प्राधान्य देत नसल्याचे समजत आहे, कारण की लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी जवळपास आठ हजार क्विंटल हरभऱ्याची आवक नमूद करण्यात आली. यावरून हरभरा उत्पादक शेतकरी खुल्या बाजारपेठेत विक्री करण्यास अधिक पसंती दर्शविली असल्याचे समजत आहे. लातूर एपीएमसीमध्ये 4600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी दर हरभराला मिळाला. हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते यामध्ये सातबारा तसेच पीक पेरा याची नोंद देखील हमीभाव केंद्रवर सादर करावी लागते. या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे खुल्या बाजारपेठेत कुठलंच कागदपत्रं मागता डायरेक्ट खरेदी केली जाते.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की हरभरा विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रांवर 15 फेब्रुवारीपासून नोंदणीस सुरुवात झाली आहे आणि ही नोंदणी प्रक्रिया 15 मे पर्यंत सुरू राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 15 मार्च पासून खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष हरभरा खरेदी करण्यास प्रारंभ होणार आहे. खरेदी केंद्रावर खूप जास्त कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच खरेदी केंद्रावर तात्काळ पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्री केल्यानंतर जवळपास चार ते पाच दिवस पैशासाठी प्रतीक्षा करावी लागते. याउलट खुल्या बाजारपेठेत शेतमाल विक्री करण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीमालाचा पैसा रोकड स्वरूपात प्रदान करण्यात येतो. 

खुल्या बाजारपेठेतील हा व्यवहार  हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पसंत पडत असल्याचे समजत आहे त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राला पसंती दर्शवली नाही कारण की आतापर्यंत लातूर जिल्ह्यात केवळ पाच हजार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. यामुळे हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असूनही लातूर जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारपेठेत हरभरा विक्रीसाठी प्राधान्य दर्शविले आहे.

English Summary: gram is buying at msp center from this date Published on: 23 February 2022, 06:25 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters