1. बातम्या

यंदाच्या वर्षी वाढणार सोयाबीनचा पेरा, पीक पद्धती मध्ये मोठा बदल,उन्हाळी सोयाबीन पेऱ्याची तयारी

यंदाच्या वर्षी झालेला मुबलक पाऊस तसेच खरीप हंगामात झालेले जबरदस्त नुकसान भरून काढण्यासाठी तसेच इतरत्र कारणांमुळे पीक पद्धती मध्ये मोठा बदल घडून आला आहे. यंदा च्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी महत्वाची पिके न पेरता सोयाबीन पेरण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यंदा च्या वर्षी शेतामध्ये उन्हाळ्यात सोयाबीन बहरताना दिसत आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
soyabean

soyabean

यंदाच्या वर्षी झालेला मुबलक पाऊस तसेच खरीप हंगामात झालेले जबरदस्त नुकसान भरून काढण्यासाठी तसेच इतरत्र कारणांमुळे पीक पद्धती मध्ये मोठा बदल घडून आला आहे. यंदा च्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी महत्वाची पिके न पेरता सोयाबीन पेरण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यंदा च्या वर्षी शेतामध्ये उन्हाळ्यात सोयाबीन बहरताना दिसत आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु प्रत्येक वर्षी मराठवाड्यात सोयाबीन ची पेरणी हजारो हेक्टर क्षेत्रावर होत असते. शिवाय हे पीक अवकाळी पाऊस तसेच वातावरणात झालेला बदल या काळात सुद्धा चांगले बहरून येते. म्हणून सोयाबीन चे उत्पन्न वाढण्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात शेतकरी राजाने सोयाबीन पेरणी करण्याचे ठरवले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात सोयाबीन चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले. असा अंदाज कृषी विभागाने सुद्धा केला आहे.

सोयाबीन पेऱ्याच्या क्षेत्रात होणार वाढ:-

यंदा च्या वर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन करण्याचे ठरवले आहे. यंदा च्या वर्षी हा उन्हाळी सोयाबीन चा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या काळात सोयाबीन पेऱ्याच क्षेत्र वाढेल असा अंदाज सुद्धा व्यक्त झाला आहे शिवाय रोगराई आणि किडीचा प्रादुर्भाव झाला नाही तर उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज शेतकरी वर्गाने व्यक्त केला आहे. त्यामुळे इथून पुढे सोयाबीन चे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच शेतकरी वर्गाने पीकपद्धती मध्ये बदल करून मोठया धाडसाने हा निर्णय घेतला आहे.

खर्च कमी आणि उत्पन्न वाढ:-

इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीन पेरण्यासाठी तसेच इतर खर्च हा खूप कमी असतो शिवाय कष्ट सुद्धा खूप कमी लागतात. पावसाच्या लांबणीमुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन पेऱ्याला उशीर झाला शिवाय यंदाच्या वर्षी उत्पादनात सुदधा मोठ्या प्रमाणात घट झाली त्यामुळे दिवसेंदिवस सोयाबीन चे भाव हे वाढतच चालले आहेत. फक्त वाढत्या उत्पन्नामुळे शेतकरी बांधवांनी पीक पद्धती मध्ये मोठा बदल घडवून आणला आहे आहे उन्हाळी सोयाबीन पेरण्याच नियोजन आखले आहे.

सोयाबीनच्या दर वाढीची मोठी अपेक्षा:-

गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये सोयाबीन चा सुद्धा समावेश होता. नुकसान झाल्यामुळे सोयाबीन च्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. त्यामुळे बाजारात आवक घटली आणि सोयाबीन च्या दारात दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली. दाराच्या आशेने आणि उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी यंदा च्या वर्षी उन्हाळी सोयाबीन पेरण्याचे ठरवले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन संपले की मे महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन ला बाजारात मोठी मागणी निर्माण होते शिवाय भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतात. शिवाय उन्हाळी पेऱ्यातून मिळालेल्या सोयाबीन चा उपयोग पुढच्या पेऱ्याला बियाणे सुद्धा वापरू शकतो आणि सोयाबीन चे उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे पीक पद्धती मध्ये बदल करून उन्हाळी सोयाबीन पेरण्याचे ठरवले आहे.

English Summary: Soybean sowing to increase this year, big change in cropping pattern, preparation for summer soybean sowing Published on: 14 February 2022, 07:05 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters