खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे जे की हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अनेक प्रयोग केले आहेत. औरंगाबाद, जालना तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुमारे १८ हजार हेक्टर वर सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यामुळे आता खरीप हंगामातील बियाणांची चिंता तर मिटलेली आहेच पण जर उतारा जास्त पडला तर यामधून शेतकऱ्यांना सुद्धा चार पैसे कमवता येणार आहेत. खरीप हंगामातील सर्वच पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या कारणामुळे पीक पद्धतीमध्ये बदल करण्याचे धाडस दाखवले आहे. उन्हाळी सोयाबीन पिकाला उतारा कमी असतो असे म्हणले जाते मात्र पोषक वातावरण आणि मुबलक पाणी असले की उन्हाळी सोयाबीन चे चित्र च पूर्ण बदलून जाते.
सध्या फुल अवस्थेत सोयाबीन :-
फक्त रब्बी हंगामतच नाही तर उन्हाळी हंगामात सुद्धा सोयाबीन पिकाचा पेरा उशिरा झालेला आहे. पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन ला फुले व शेंगा लागलेल्या आहेत जे की यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची हमी मिळालेली नाही. दरवर्षी फक्त ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांवर शेतकऱ्यांचा भर असतो मात्र यंदाच्या वर्षी मोहरी, सुर्यफूल, भुईमूग, राजमा अशा विविध पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस सोडून पिकाला कोणात्याही प्रकारचा धोका नसल्याने पीक बहरत आहे.
असा आहे औरंगाबाद विभागतला सोयाबीन पेरा :-
औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच उन्हाळ्यात पीक पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. दरवर्षी सोयाबीन चे पीक घेतले जाते ते फक्त बियाणांची उपलब्धता व्हावी. मात्र यंदा शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या दृष्टीने हा बदल घडवून आणलेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचा पेरा ८ हजार २०६ हेक्टर वर झालेला आहे तर बीड जिल्ह्यात ७ हजार ९५० हेक्टरवर पेरा झालेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ३ हजार हेक्टरवर पेरा झालेला आहे. यामुळे सोयाबीन बियाणांचा प्रश्न मार्गी लागला आहे पण शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनही पडणार आहे.
सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव :-
सोयाबीन पीक जोमात बहरत असताना त्यावर खोडकिडीचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे जे की यामुळे पिकाच्या शेंड्याचा भाग वाळत चाललेला आहे. जर खोडकिडीने पिकाच्या बुडापर्यंत शिरकाव केला तर उत्पादनात घट होणार आहे. जे की या दरम्यान तुम्ही थायामिथोक्झाम (30 एफ. एस.) 0.25 मि.लि. (50 मि.लि. प्रति एकर) किंवा इथिऑन 3 मि.लि. (600 मि.लि. प्रति एकर प्रमाणे फवारणी करावी असे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
Share your comments