खरीप हंगामात (In the kharif season) झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात सर्वत्र खरीप हंगामाच्या पिकांना मोठा फटका बसला होता. सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे या पिकावर देखील अवकाळीचा (Untimely Rain) विपरीत परिणाम बघायला मिळाला त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले. उत्पादनात घट झाली म्हणजे बाजारभावात वाढ होते हे बाजारपेठेची गणितच आहे. बाजारपेठेचे हे गणित हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन साठी उपयोगी पडले मात्र आता सोयाबीनचा हंगाम (Soybean season) अंतिम टप्प्यात असताना बाजारपेठेचे हे गणित उलटे पडताना दिसत आहे.
हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असतानाच सोयाबीनचे दर जवळपास महिन्याभरापासून स्थिर आहेत. सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होईल या आशेने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे मात्र आता बाजारपेठेतील चित्र बघता आगामी काही दिवस सोयाबीनचे भाव वाढण्याची कुठली चिन्हे दिसत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता चिंतेत सापडला आहे. गेल्या एक महिन्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (soybean growers) अनेक युक्त्या वापरून पाहिल्या मात्र बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वधारण्याचे काही नाव घेत नाहीत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते आजतागायत सोयाबीनचे बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपासच फिरत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली, मात्र सोयाबीनच्या बाजार भावात कुठलाच फरक दिसला नाही त्यामुळे आता सोयाबीन विक्री हा एवढाच पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते, भविष्यात सोयाबीनचे आजचे बाजार भाव टिकून राहतील की नाही याबाबतही संभ्रम अवस्था आहे आणि सोयाबीनचे भाव बाजारपेठेतील चित्र बघता वाढण्याची शक्यता कमीच आहे.
शेतकऱ्यांना हा एकच पर्याय
हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे धोरणच बाजारपेठेतील दर ठरवत होते. बाजारपेठेत दर कमी असले तर विक्री करायची नाही आणि वाढले तर टप्प्याटप्प्याने विक्री करायची या शेतकऱ्याच्या धोरणामुळे सोयाबीनच्या दरात आतापर्यंत समाधानकारक दृश्य बघायला मिळत होती. मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सुरुवातीचा हा मेगा प्लॅन देखील आता काम करताना दिसत नाही,तसेच या रब्बी हंगामात उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढला आहे त्यामुळे आगामी काही दिवसात बाजारपेठेत उन्हाळी सोयाबीन मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकतो.
नव्या सोयाबीनची बाजारात इंट्री झाल्यास जुन्या सोयाबीनला मागणी कमी होईल. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन लवकरात लवकर विक्री करून टाकावा. बाजारपेठ मिळत असलेला दर हा जरी अपेक्षेप्रमाणे नसला तरी समाधानकारक असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत, त्यामुळे सोयाबीनची विक्री करण्याचा सल्ला सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांना देत आहेत.
Share your comments