सोयाबीन उत्पादक (Soybean growers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोयाबीनचा बाजारभावात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कालचे सोयाबीनचे बाजारभाव पाहिले असता, सोयाबीनच्या बाजारभावात नक्कीच वाढ झालेली दिसत आहे.
काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक 7800 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.
सोयाबीनचा हा बाजारभाव भाव वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती (Vaduj Agricultural Produce Market Committee) इथे मिळाला आहे. आज या बाजार समितीमध्ये केवळ 15 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली आणि यासाठी किमान भाव 7 हजार 400 कमाल भाव 7 हजार 800 आणि सर्वसाधारण भाव 7 हजार 450 रुपये इतका मिळाला.
महात्मा गांधींची आज 153 वी जयंती; गांधीवादातून 'हे' पाच धडे तुम्ही घेतले पाहिजेत...
इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव
राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे (Soybean Market Price) बाजार भाव 5 हजार च्या दरम्यान आहेत. उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 400, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 36, आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 111, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 100, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार असा सोयाबीनला कमाल भाव मिळत आहे.
शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 200, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 270 रुपये तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 325 रुपयांचा कमाल भाव सोयाबीनला मिळाला आहे.
महत्वाचे म्हणजे सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) याठिकाणी झाली आहे. ही आवक 3 हजार 746 क्विंटल इतकी झाली आहे. यासाठी किमान भाव 4 हजार 500 कमाल भाव 5 हजार 325 आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 100 रुपये एवढा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत
शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो
Share your comments