1. बातम्या

Soybean Market Price: 'या' बाजारसमितीत सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या

मागच्या काही दिवस सोयाबीन बाजारभाव उतरले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. आता मात्र सोयबिनचे दर सुधारले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Soybean

Soybean

मागच्या काही दिवस सोयाबीन बाजारभाव उतरले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. आता मात्र सोयबिनचे दर सुधारले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

काल सायंकाळी पर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन बाजारभाव विषयी आज आपण माहिती घेऊया. काल सोयाबीनला कमाल भाव 5 हजार 390 प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे.

काल सायंकाळी पर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 5390 प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे.

हा बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला याविषयी आपण पहिले तर, हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. विशेष म्हणजे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 हजार 163 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market Price) आवक झाली आहे.

भारतातील 5 टॉप देशी गायींचे करा पालन; एका गाईचे पालन केले तरी होईल भरपूर कमाई

यासाठी किमान भाव ४ हजार ५०० तर कमाल भाव ५ हजार ३९० आणि सर्वसाधारण भाव 4 हजार 890 इतका मिळाला. दरम्यान सर्वाधिक आवक ही सोयाबीनसाठी नावाजलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) इथेच झाली आहे.

महत्वाचे म्हणजे याठिकाणी आवक 3 हजार 556 क्विंटल इतकी झाली आहे. यासाठी किमान भाव 4 हजार 830, कमाल भाव ५ हजार २६१ आणि सर्वसाधारण भाव 5 हजार 160 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. मागच्या सोयाबीन दराचा विचार केला तर, त्याच्या तुलेनत सोयाबीन दरात वाढ झाली आहे.

पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग योजनेला केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांचे अनुदान जाहीर

त्यामुळे आज शेतकऱ्यांना विशेष सल्ला दिला जात आहे. आज सोयाबीन बाजारात विक्री करण्यास घेऊन जाताना मागचे दर तपासून तसेच बाजारभाव माहिती काढून, अंदाज घेऊन विक्री करण्यास न्यावा. रोजचे बाजारभाव सायंकाळी 5 पर्यंत अपडेट होत असतात.

महत्वाच्या बातम्या 
25 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या लोकांचे सोनेरी दिवस सुरु होणार; वाचा तुमचे राशीभविष्य
'या' औधषी वनस्पतीची एकदाच लागवड करा आणि तीन वेळा कापणी करत कमवा लाखों रुपये
शेत जमीन खरेदी-विक्रीमध्ये केला मोठा बदल; सरकारच्या निर्णयाने शेतकरी चिंतामुक्त

English Summary: Soybean highest market price market committee Published on: 23 September 2022, 09:37 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters