Nagpur Soybean News :
नागपूरसह पूर्व विदर्भात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आठ ते पंधरा दिवसांपासून पाऊस न झाल्याने कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आता सोयाबीन पिकासाठी पावसाची गरज असताना हा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत आहेत.
मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. आता सोयाबीनमध्ये सध्या शेंगा भरण्याची स्थिती आहे. तसंच काही सोयाबीन फुलोऱ्यात आहे. या पिकाला पाण्याची गरज आहे. परंतु पाऊस नसल्याने पिकाच मोठं नुकसान होऊ लागलं आहे. तसंच काही भागातील सोयाबीन आता रोगाचा प्रादुर्भाव देखील होऊ लागला आहे.
पावसाचा कुठे आठ दिवसाचा कुठे दहा दिवसाचा खंड पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच नुकसान होत आहे. पिकांची वाढ सुद्धा पुरेशी झालेली नाही. सोयाबीनचे पीक हे जवळपास तीन साडेतीन महिन्याचं पीक आहे. त्या काळात सोयाबीनच्या पिकाला पाण्याची गरज असते. परंतु आता पावसाचा खंड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
अकोल्यात पावसाचा खंड, सोयाबीन धोक्यात
अकोला जिल्ह्यात देखील पावसाने मोठा खंड दिल्याने पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीन पिकाला या अवस्थेत पावसाची नितांत गरज निर्माण झाली असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. तर बुलडाण्यात ४ लाख १३ हजार आणि वाशीम जिल्ह्यात ३ लाख ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पावसाने मोठी उघडीप दिल्याने चिंता वाढत चालली.
दरम्यान, मान्सूनचे आगमन राज्यात तीन महिने पूर्ण झाले आहेत. पण राज्यात अद्यापही अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अकोला जिल्ह्यातही पावसाची मोठी तूट कायम आहे.
Share your comments