1. बातम्या

सोयाबीन पिक संरक्षण सल्ला

KJ Staff
KJ Staff

सध्या बहुतांश: ठिकाणी सोयाबीन पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असुन यावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी त्‍वरीत कीटकनाशकाची फवारणी करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी दिला आहे.

पिक संरक्षण:

प्रती एकर ६० मिली क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % किंवा१४० मिली इंडाक्झाकार्ब १५.८ % किंवा १८० मिलीस्पाइनेटोरॅम ११.७ %, किंवा ५० मिली थायमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.३% यापैकी कोणत्‍याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.

वरील किटकनाशकाचे प्रमाण फवारणी पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकर याप्रमाणेच वापरावे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनवर काही ठिकाणी शेंगा करपा व  चारकोल रॉट दिसून येत आहे,त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून प्रती एकरी कार्बेन्डेझिम १२% + मॅन्कोझेब ६३% या संयुक्त बुरशीनाशकाची २०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters