सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप हंगामातील पीक असून महाराष्ट्रातील बहुसंख्य भागांमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात घट आली होती. यामुळे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोयाबीनची स्थिती यामुळे देखील मागच्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला. परंतु यावर्षी नेमके सोयाबीनची भावाचे स्थितीबद्दल अजूनदेखील कुठल्याही प्रकारचा अंदाज बांधता येत नाहीये.
नक्की वाचा:तुमची सोयाबीन पिवळी पडत आहे? त्यावरची ही आहेत कारणे आणि उपाय
मागच्या वर्षीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर खूप प्रमाणात तेजीत होते व याचा देखील परिणाम मागच्या वर्षी सोयाबीन दर वाढीवर झाला होता. खाद्यतेलाच्या दर वाढल्यामुळे ही तेजी होती व याचाच परिणाम नेमका सोयाबीन पेंडीचे दर वाढण्यावर झाला. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन निर्यात कमी राहिली.
परंतु जर या वर्षाचा विचार केला तर गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून तेलाच्या दरात नरमाई आल्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले व सोयापेंडचे दर देखील घसरले. याचाच परिणाम ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळाला व तेलबिया पेंड निर्यात तब्बल 71 टक्क्यांनी वाढली.
जर आपण मागच्या वर्षीच्या सोयाबीन पेंड निर्यातीचा विचार केला तर ती 11 लाख टनांपर्यंत या कालावधीत पोचली होती व त्या तुलनेत या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये पंधरा लाख टनांपर्यंत तेलबिया पेंड निर्यात झाली.
जर आपण मागच्या दोन महिन्याचा विचार केला तर सोया पेंड निर्यातीत चांगली वाढ झाली आहे व ही वाढ ऑगस्ट महिन्यात जवळपास 18 हजार टनांपर्यंत झाली. जर आपण सध्याच्या भारतीय सोया पेंडच्या भावाचा विचार केला तर 52 हजार ते 53 हजार रुपये प्रतिटन आहे.
जर सोया पेंड निर्यात वाढली तर सोयाबीनच्या भावाला एक चांगला आधार मिळेल व वाढलेली सोयाबीन पेंड निर्यात सोयाबीन उत्पादक यांच्या पथ्यावर पडेल असा देखील अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा:सांगा शेती करायची कशी! कांद्यापाठोपाठ लसनाचीही दुर्दशा; बाजारात मिळतोय 5 रुपये किलो भाव
Share your comments