सोयाबीनच्या भावाबाबत नेमका अंदाज बांधणे कठीण जात आहे.एकीकडे सोयाबीनचे दर घसरत असताना केंद्र सरकारने वायदे व्यवहारांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे त्याचा सोयाबीनच्या भावावर परिणाम होणार आहे असे असले तरी शेतकऱ्यांनी संयम बाळगून सोयाबीन बाजारपेठेत आणले तर त्यांचे दरही टिकून राहणार आहे
सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करत असल्यामुळे दरात झालेल्या बदलामुळे नुकसान होत आहे. आवक कमी जास्त होत असले तरी दर मात्र स्थिर असल्याने काय भूमिका घ्यावी हा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
घटत्या दरामुळे सोयाबीन विक्रीवर भर
यापूर्वी सोयाबीन च्या दरात घट झाली होती तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करण्यावर भर दिला होता. त्यामागे प्रमुख कारण होते की उत्पादन घटल्यामुळे दरात वाढ होणार हा विश्वास शेतकऱ्यांना होता.
पण आता केंद्र सरकारची धोरणे आणि भविष्यात उन्हाळी हंगामात सोयाबीन चे वाढलेले क्षेत्र या चिंतेच्या बाबी ठरत आहेत. त्यामुळे जो भाव मिळत आहे त्या भावात सोयाबीन विक्री केली जात आहे.
तीन आठवड्यात आवक पण दर स्थिर
आपण पाहिले की दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली होती.त्याच्यामागे प्रमुख कारण होते योग्य दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री न करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेऊन एकजूट दाखवली होती.
मधल्या काळामध्ये मागणी वाढून त्यामानाने पुरवठा कमी असल्याने 4500 वरील दर थेट सहा हजार सहाशे पर्यंत गेले होते.त्यानंतर सोया पेंड आयातीची चर्चा आणि आता केंद्र सरकारने माहिती विक्रीवर घातलेली बंदी यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी पडझड झाली आहे. आता तर मालाला उठाव नसल्यामुळे सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक हा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
Share your comments