सोयाबीनची लागवड हि भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते, महाराष्ट्रात देखील सोयाबीनची लागवड हि लक्षणीय आहे. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबियापैकी एक आहे तसेच सोयाबीन खाद्यतेलाचा भारत सर्वात मोठा कंजुमर आहे. महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सोयाबीन उत्पादक राज्य आहे.
तसेच मध्य प्रदेश ह्या यादीत शीर्षस्थानी विराजमान आहे. अशी जरी परिस्थिती असली तरी भारत सोयाबीन उत्पादनात आत्मनिर्भर नाही आहे आपल्याला दरवर्षी सोयाबीन आयात करावा लागतो मग आता विषय असा उभा राहिलाय की, आपल्याकडे आपल्याला आवश्यक सोयाबीन उत्पादीत होत नाही तरी देखील सोयाबीनला चांगला बाजारभाव का मिळत नाही आहे आणि अशी परिस्थिती सर्व भारतभर एकसमान आहे महाराष्ट्रात सोयाबीन चक्क हमीभावपेक्षा कमी विकला जात आहे, महाराष्ट्रात तर सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे, सोयाबीनचे बहुतांश पिक हे पाण्याखाली गेलेले आहे मग असे असूनही महाराष्ट्रात सोयाबीनला एवढा कमी बाजारभाव का मिळत आहे, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ह्यावर्षी खुप अडचणीना सामोरे जात आहे. आधी पावसाने पिकांची राखरांगोळी केली आणि आता सोयाबीनचा पडता भाव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरड मोडत आहे. परिस्थिती एवढी वाईट झालीय की सोयाबीनला हमीभावपेक्षा कमी किमत मिळत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पिक आहे, कांद्यानंतर सर्वात जास्त उत्पादन हे सोयाबीन पिकाचे घेतले जाते.महाराष्ट्रात सोयाबीन पिकाखाली जवळपास 40 लाख हेक्टर एवढे मोठे क्षेत्र आहे.
सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी हा अवलंबून आहे. आणि जर अशातच असा कमी भाव मिळत राहिला तर कसं काय शेतकऱ्यांचे अच्छे दिन येतील आणि केव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट होईल हा सर्वात मोठा प्रश्न आता अनेक शेतकरी विचारत आहेत.
2 नोव्हेंबर ला विदर्भातील नागपूर मार्केट मध्ये सोयाबीनला हमीभावपेक्षा कमी भाव मिळाला. येथे सोयाबीनला किमान भाव हा 30 रु किलो म्हणजे 3000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आणि सोयाबीन साठी सरकारने हमीभाव हा 39.50 रु किलो अर्थात 3950 रुपये प्रति क्विंटल ठेवला आहे.
मराठवाडयात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे येथील जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 35 रुपये किलो एवढा भाव मिळाला म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रात सर्वत्र सोयाबीन हा हमीभावपेक्षा कमी किंमतीत विकला जातोय. त्यामुळे आता शेतकरी शासन दरबारीं विचारणा करत आहेत की, कसं काय शेतकऱ्यांचे उत्पन्न हे 2022 पर्यंत दुप्पट होणार आणि कसं बरं शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार.
Share your comments