सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सोयाबीन ला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी राजा आनंदात आहे.सध्या जर बाजारांमध्ये सगळ्यात चर्चेचे पिक असेल तर ते म्हणजे सोयाबीन आहे. त्याचे कारण आहे सोयाबीन मिळालेला उच्चांकी भाव तसेच सोयाबीन पिक वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चेत राहिलेले आहे.
सोयाबीनच्या भावा कडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. मागच्या आठवड्याचा विचार केला तर बाजार समित्यांमध्ये मुहूर्ताचे सोयाबीन बाजारात आल्यामुळे सोयाबीन ला उच्चांकी भाव मिळाले. परंतु हे मुहूर्ताचे भाव काही वेळा पुरते मर्यादित आहेत. मागच्या आठवड्यामध्ये हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला अकरा हजार रुपये मिळाला होता तर बार्शी येथील बाजार समितीमध्ये अकरा हजार पन्नास रुपये दर मिळाला होता. परंतु हे भाव मुहूर्ताच्या सोयाबीनला मिळालेले आहेत.
कारण कुठल्याही पिकाची किंवा सोयाबीनची आवक सुरू झाली की नवीन बाजारपेठेत आलेल्या पिकाला मुहूर्ताच्या साठी एक किंवा दोन क्विंटलला विक्रमी दर दिला जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु सोयाबीनला सध्या आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे.
आता मार्केटमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली असून उत्तम कॉलिटी च्या सोयाबीनला आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे.हा दर काही दिवसांपासून स्थिर आहे. तसेच आवक कमी असल्याने दरही चांगले आहेत.
त्यामागे प्रमुख कारण सांगता येईल की यावर्षी सोयाबीनची पेरणी उशिराने झाली आहे व मध्यंतरीच्या आलेल्या पावसामुळे काढणीही लांबल्याने भविष्यात दर कमी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त होत आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सरासरी एवढा चांगला भाव मिळू शकतो परंतु या वर्षी पावसामुळे बरेच सोयाबीनचा दर्जा ढासळलेला असल्याने मालाचा दर्जा पाहून दर मिळतील असा अंदाज आहे.( संदर्भ – टीव्ही नाईन मराठी )
Share your comments