सध्या सोयाबीनचे बाजार भावा मध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत आहे. या वर्षी सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने सोयाबीनचा हवा तेवढा पुरवठा होऊ शकला नाही.
त्यामुळे सातत्याने सोयाबीनचा बाजारभाव मध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी देखील बाजारपेठेचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणले होते. सद्यस्थितीत सोयाबीनचे बाजार भाव चा विचार केला तर गुरूवारच्या दिवशी सात हजार 330 रुपये क्विंटल सोयाबीन पोहोचले होते तर शुक्रवारी हाच दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल वर आला. या बाजार भावांमधील चढ-उताराचे प्रमुख कारण हे रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध हे सांगण्यात येत आहे. गेल्या आठ फेब्रुवारीला सहा हजार रुपये क्विंटल सोयाबीनचे भाव आता तर दहा फेब्रुवारी रोजी चक्क चारशे रुपयांनी वाढ झाली. या युद्धाचा परिणाम सोयाबीन वरच नाहीतर मोहरीच्या भाववाढीवर देखील झाला आहे. जर शासनाचा सोयाबीनच्या हमीभावाचा विचार केला तर तो तीन हजार 950 रुपये आहे. हमीभावापेक्षा किती तरी पुढे या वर्षी सोयाबीनचे बाजार भाव आहेत.
मागच्या काही दिवसात सोयाबीनचे बाजार भाव सहा हजार आठशे रुपयांपर्यंत वाढले होते परंतु त्यानंतर भावात घसरण पाहायला मिळाली. यामागील प्रमुख कारण म्हणजे पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना खाद्यतेलाचे भाव वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार खूपच प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच खाद्य तेलावरील आयात शुल्क शून्यकरण्यात आले आहे. भाववाढ रोखण्यासाठी शासनातर्फे बरेच उपाय योजना केल्या जात असल्या तरी परंतु आंतरराष्ट्रीय परिस्थिती मात्र यापेक्षा खूपच वेगळी आहे.
प्रमुख सोयाबीन उत्पादक देश असलेल्या अर्जेंटिना आणि ब्राझील मध्ये अनुक्रमे दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे 230 लाख टन सोयाबीन उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ती परिस्थितीदेखील सोयाबीनचे बाजार भाव वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. येणाऱ्या गुढीपाडवा पर्यंत सोयाबीनला चांगली बाजार भाव मिळतील आणि नवीन वर्षामध्ये देखील शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षा आहे.
Share your comments