रशिया आणि युक्रेन मध्ये युद्धाची ठिणगी पडल्यामुळे त्याचा परिणाम हा विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होत आहे गॅटकरारामुळे जागतिक घडामोडींचा थेट परिणाम हा स्थानिक बाजारपेठेवर होत असून बुधवारी खुल्या बाजारांमध्ये सोयाबीनच्या भावात अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
खुल्या बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात सात हजार 100 रुपये क्विंटल इतकी वाढ झाल्याने अचानक सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
रशिया युक्रेन युद्धामुळे बाजारपेठेतील स्थिती (Russia -Ukrein War Effect)-
यावर्षी जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर सोयाबीनची मागणीही अत्यल्प प्रमाणात होती त्यामुळे सोयाबीनचे दर हे फारसे चांगले नव्हते. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे अगोदर सोनं आणि चांदीच्या दरात देखील तेजी आली होती. आता या युद्धाच्या परिणामामुळे सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. तसेच आपल्याला माहित आहेच कि सोयाबीन चा प्रमुख उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये देखील सोयाबीनचे उत्पादन घटल्यानेत्याचा परिणाम हा सोयाबीन दरवाढीवर झाला आहे.
वास्तविक पाहता खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर वाढतील अशी अपेक्षा नव्हती परंतु रशिया युक्रेन युद्धाच्या घटनेमुळे या दरामध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.परंतु आता सोयाबीनच्या दरात वाढ जरी झाली असली तरी शेतकऱ्यांकडे मात्र आता सोयाबीनचा साठा नसल्यामुळे हा दरवाढीचा फायदा फक्त व्यापारांना होण्याचीशक्यता जास्त आहे. जर मागच्या वर्षीचा विचार केला तर मे महिन्याच्या अंतर्गत सोयाबीनचे दर दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.तेव्हाची ही दरवाढ परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान केल्याने उत्पादन घटल्याने झाली होती. परंतु यानंतर सोयाबीनचे नवीन उत्पादन बाजारात दाखल झाल्याने दरात मोठी घसरण होऊन हे दर पाच ते साडेसहा हजार रुपयांपर्यंत आले होते.
आता अशीच पुनरावृत्ती होऊन या युद्धामुळे सोयाबीनचे दर भडकले आहेत. पशुखाद्यामध्ये देखील सोयाबीनचा वापर करण्यात येतो. एवढेच नाही तर सोयाबीनच्या खाद्यतेल निर्मितीसाठी सात मोठी मागणी असते. तेलबियाने उत्पादन घटल्याने मागच्या वर्षाची दरवाढीची पुनरावृत्ती या वर्षी पाहायला मिळत आहे.
Share your comments