सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून येथे जोरदार प्रचार सुरु आहे. येथे सर्वच राजकीय पक्ष सध्या अनेक आश्वासने देत आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेश म्हणजेच प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, इतकच नाही तर या बसचा डीपीआर तयार असल्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे.
उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपचे प्रमुख नेते उत्तर प्रदेश मध्ये तळ ठोकून आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या प्रचारसभा जोरात सुरू आहेत. यामध्ये गडकरी देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. नितीन गडकरी यावेळी म्हणाले, माझ्याकडे आता रोपवे, केबल कार आली आहे. आता मी उपमुख्यमंत्री केशवजींना सांगितले की, हवेत चालणाऱ्या बसचाही डीपीआर तयार करत आहोत. प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू.
तसेच ते म्हणाले, तुम्ही रस्ता तयार करून घ्या. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. मी करोडोमध्ये चर्चा करतो. प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले, यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार का हे येणाऱ्या काही काळातच समजेल.
गडकरी म्हणाले, प्रयागराजमध्ये विमानतळ आहे. आता येथे रिव्हरपोर्टही तयार होणार आहे. केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत 40 रिव्हरपोर्ट बांधले आहेत. असे ते म्हणाले. प्रयागराजमध्ये बांधण्यात येणारा रिंग रोड आणि फाफामऊ येथील गंगेवर बांधण्यात येणारा सहा पदरी पूल 2024 पर्यंत पूर्ण होईल. येत्या काही काळात उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कामाचे कौतुक केले.
Share your comments