बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ज्यांना सर्व लोक मसीहा या नावाने ओळखतात. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना त्याने अनेक लोकांना आपल्या घरी पोहोचवलं होतं. त्याच्या या कामामुळे अनेकजण आपल्या घरी आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकला होता. सध्या सोनू गरजू लोकांच्या त्यांना हवी ती मदत करत आहे. त्यामुळे सोनू रील लाईफमधील हिरो न राहता तो आता रिअल लाईफमधील हिरो झाला आहे.
सोनू सूद आज त्याच्या औदार्यामुळे करोडो हृदयांवर राज्य करत आहे. चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा सोनू हा खऱ्या आयुष्यातला हिरो आहे आणि त्याने ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. मदतीमुळे सोनू सूद परत एकदा चर्चेत आला आहे. तेही एक गरीब कुटुंबाला म्हैस घेण्यासाठी त्याने मदत करण्याचं ठरवलं आहे. सोनू सूद सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटच्या माध्यमातून ते गरजू लोकांच्या हाकेला प्रतिसाद देत असतात. ट्विटरवर एका कुटुंबाला मदत मिळावी म्हणून भानू प्रसान नावाच्या व्यक्तीने सोनूला ट्विट केलं.
भानू प्रसन नावाच्या युजरने ट्विट करून लिहिले – हॅलो सोनू सूद सर… नालगोंडा जिल्ह्यातील हे कुटुंब… कोविडमुळे या कुटुंबाच्या प्रमुखाचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात तीन मुले असून या मुलांची आई कर्करोगाशी लढा देत आहे. त्यामुळे कृपया त्यांच्यासाठी म्हैस खरेदी करा, जेणेकरून ते आपला उदरनिर्वाह करू शकतील.
सोनूने ठेवली महत्त्वाची अट
हे ट्विट पाहिल्यानंतर सोनू सूदने रिट्विट केले आणि लिहिले- 'चल बेटा, ही कुटुंबासाठी म्हैस घेऊया. बस, फक्त दुधात पाणी मिसळू नका.’ सोनू सूद यांचे ट्विट खूप व्हायरल होत आहे.
Share your comments